बास्केट बॉल स्पर्धेत महाराष्ट्र संघाची बाजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2021 01:24 IST2021-07-29T01:23:37+5:302021-07-29T01:24:00+5:30

केंद्र शासनाच्या नेहरू युवा संघटनेच्या फिट इंडिया मूव्हमेंटअंतर्गत गोवा येथे तिसऱ्या युवा क्रीडा अजिंक्यपद स्पर्धा नुकत्याच पार पडल्या. यात खुल्या बॉस्केट बॉल स्पर्धेत महाराष्ट्राच्या संघाने कर्नाटक संघावर पाच गुणांनी विजय मिळवला.

Maharashtra team wins basketball tournament | बास्केट बॉल स्पर्धेत महाराष्ट्र संघाची बाजी

बास्केट बॉल स्पर्धेत महाराष्ट्र संघाची बाजी

नाशिक : केंद्र शासनाच्या नेहरू युवा संघटनेच्या फिट इंडिया मूव्हमेंटअंतर्गत गोवा येथे तिसऱ्या युवा क्रीडा अजिंक्यपद स्पर्धा नुकत्याच पार पडल्या. यात खुल्या बॉस्केट बॉल स्पर्धेत महाराष्ट्राच्या संघाने कर्नाटक संघावर पाच गुणांनी विजय मिळवला. या विजयी संघात नाशिकच्या पूनम शिंदे व वेदिका शहाळे यांचा समावेश होता. अन्य खेळाडूंमध्ये दीपिका मेहता, उर्वी डेढिया, मुग्धा कुलकर्णी, शैली त्यागी (मुंबई), वर्षा जोशी, वंदना पाटील (कोल्हापूर) व स्वाती मिसार, पुणे यांचा समावेश होता. विजयी संघातील चार खेळाडूंची नेपाळमधील पोखरा येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय बास्केट बॉल स्पर्धेसाठी भारतीय संघात निवड होणार आहे.

 

 

Web Title: Maharashtra team wins basketball tournament