महाराष्ट्राचे संघ भुवनेश्वरला रवाना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2019 15:44 IST2019-02-26T15:44:26+5:302019-02-26T15:44:38+5:30

नाशिक : भुवनेश्वर येथे दि. २५ ते २८ फेब्रुवारीदरम्यान सबज्युनिअर गटाच्या राष्ट्रीय व्हॉलीबॉल अजिंक्यपद स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या महाराष्ट्राच्या मुलींच्या संघात नाशिकच्या संजना जगताप, दिया पठाण यांची, तर मुलांच्या संघात नाशिकच्या शाजिन नायर याची निवड झाली आहे.

 Maharashtra team to Bhubaneswar | महाराष्ट्राचे संघ भुवनेश्वरला रवाना

महाराष्ट्राचे संघ भुवनेश्वरला रवाना

ठळक मुद्दे राष्ट्रीय व्हॉलीबॉल : भुवनेश्वर येथे आयोजित स्पर्धेसाठी नाशिकच्या तीन खेळाडूंची निवड


नाशिक : भुवनेश्वर येथे दि. २५ ते २८ फेब्रुवारीदरम्यान सबज्युनिअर गटाच्या राष्ट्रीय व्हॉलीबॉल अजिंक्यपद स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या महाराष्ट्राच्या मुलींच्या संघात नाशिकच्या संजना जगताप, दिया पठाण यांची, तर मुलांच्या संघात नाशिकच्या शाजिन नायर याची निवड झाली आहे. शिर्डी येथे झालेल्या राज्य स्पर्धेतून महाराष्ट्राच्या संघाची निवड करण्यात आली आहे. या निवड चाचणीत चांगली कामगिरी केल्यामुळे नाशिकच्या या तीन खेळाडूंची महाराष्ट्राच्या संघात निवड झाली आहे. संजना जगताप आणि दिया पठाण या नाशिकरोडच्या रेणुका क्र ीडा असोसिएशन येथे मनोज म्हस्के यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करतात, तर शाजिन नायर हा एचएएल ओझर येथे अभिजित देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करतो. भुवनेश्वर येथील राष्ट्रीय स्पर्धेसाठी रवाना होण्यापूर्वी महाराष्ट्राच्या मुला-मुलींच्या संघाचे सराव शिबिर पुणे येथे आयोजित करण्यात आले होते. या सराव शिबिरानंतर महाराष्ट्राचे दोन्हीही संघ भुवनेश्वर येथे आयोजित राष्ट्रीय स्पर्धेसाठी रवाना झाले.

Web Title:  Maharashtra team to Bhubaneswar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.