महाराष्ट्र केसरी जिल्हा निवड चाचणी १४ ला

By Admin | Updated: December 7, 2014 01:30 IST2014-12-07T01:28:59+5:302014-12-07T01:30:58+5:30

महाराष्ट्र केसरी जिल्हा निवड चाचणी १४ ला

Maharashtra Kesari district selection test on 14th | महाराष्ट्र केसरी जिल्हा निवड चाचणी १४ ला

महाराष्ट्र केसरी जिल्हा निवड चाचणी १४ ला

  नाशिक : जिल्हा तालीम संघाच्या वतीने महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेसाठीची जिल्हा निवड चाचणी स्पर्धा १४ डिसेंबरला होणार असल्याची माहिती संघाचे अध्यक्ष संजय चव्हाण यांनी दिली़ अहमदनगर येथे २४ डिसेंबरपासून ५८वी राज्यस्तरीय वरिष्ठ गटाच्या अजिंक्यपद स्पर्धा तसेच महाराष्ट्र केसरी किताब स्पर्धा होत आहेत़ यासाठी जिल्हा संघाची निवड करण्यासाठी १४ डिसेंबरला मीनाताई ठाकरे विभागीय क्रीडासंकुल येथे निवड चाचणी स्पर्धा होणार आहेत़ यामध्ये ५७ किलो, ६१, ६५, ७०, ७४, ८६, ९७ या गटांची तसेच महाराष्ट्र केसरीसाठीच्या ८६ ते १२५ किलो वजन गटांचा यामध्ये समावेश असणार आहे़

Web Title: Maharashtra Kesari district selection test on 14th