महाराष्ट्र एक्स्प्रेस वर्ध्यापर्यंतच धावणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 4, 2020 00:16 IST2020-02-04T00:16:08+5:302020-02-04T00:16:51+5:30

मनमाड : गोंदिया स्थानकात सुरू असलेल्या कामामुळे या महिन्यातील चार दिवस कोल्हापूर-गोंदिया महाराष्ट्र एक्स्प्रेस वर्ध्यापर्यंतच धावणार आहे, अशी माहिती रेल्वे सूत्रांनी दिली.

Maharashtra Express will run till Wardha | महाराष्ट्र एक्स्प्रेस वर्ध्यापर्यंतच धावणार

महाराष्ट्र एक्स्प्रेस वर्ध्यापर्यंतच धावणार

ठळक मुद्देगोंदिया येथे सुरू असलेल्या कामामुळे रेल्वे प्रशासनाकडून मेगा ब्लॉक

लोकमत न्यूज नेटवर्क
मनमाड : गोंदिया स्थानकात सुरू असलेल्या कामामुळे या महिन्यातील चार दिवस कोल्हापूर-गोंदिया महाराष्ट्र एक्स्प्रेस वर्ध्यापर्यंतच धावणार आहे, अशी माहिती रेल्वे सूत्रांनी दिली.
महाराष्ट्र एक्स्प्रेसचे सुटण्याचे स्थानक असलेल्या गोंदिया येथे सुरू असलेल्या कामामुळे रेल्वे प्रशासनाकडून मेगा ब्लॉक घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे गाडी क्रमांक ११०३९ डाउन कोल्हापूर- गोंदिया महाराष्टÑ एक्स्प्रेस ही ३ फेबु्रवारी, १० फेबु्रवारी, १७ फेबु्रवारी व २४ फेबु्रवारी रोजी प्रस्थान स्टेशनवरून निघून वर्धा येथे थांबविण्यात येणार आहे. ही गाडी थेट गोंदिया येथे जाणार नाही.
गाडी क्रमांक ११०४० अप महाराष्ट्र एक्स्प्रेस ही गाडी ५ फेबु्रवारी, १२ फेबु्रवारी, १९ फेबु्रवारी व २६ फेबु्रवारी या दिवशी गोंदिया रेल्वे स्थानकावरून सुटण्याऐवजी वर्धा स्थानकावरून नियोजित वेळी सोडण्यात येणार आहे.

Web Title: Maharashtra Express will run till Wardha