महाराष्टÑ चेंबरचा कश्कदार्य सरकारशी करार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 14, 2019 00:25 IST2019-10-13T22:14:33+5:302019-10-14T00:25:10+5:30
महाराष्ट्र चेंबर आॅफ कॉमर्स, इंडस्ट्री अॅण्ड अॅॅग्रीकल्चर व कश्कदार्य प्रदेश, उझबेकिस्तानच्या राज्य सरकारबरोबर कश्कदार्य गुंतवणूक मंचावर व्यापार-उद्योगाच्या वाढीसाठी व विकासासाठी सामंजस्य करार करण्यात आला.

व्यापार-उद्योगाच्या वाढीसाठी सामंजस्य करारावर स्वाक्षरी करताना संतोष मंडलेचा व जफर रु झिये. समवेत प्रतिनिधी.
नाशिक : महाराष्ट्र चेंबर आॅफ कॉमर्स, इंडस्ट्री अॅण्ड अॅॅग्रीकल्चर व कश्कदार्य प्रदेश, उझबेकिस्तानच्या राज्य सरकारबरोबर कश्कदार्य गुंतवणूक मंचावर व्यापार-उद्योगाच्या वाढीसाठी व विकासासाठी सामंजस्य करार करण्यात आला. या सामंजस्य कराराचा उद्देश दोन्ही देशांतील व्यापार उद्योग क्षेत्रांमधील व्यावसायिक संबंधांच्या विकासासाठी एक व्यावहारिक चौकट स्थापित करणे आणि परस्पर आर्थिक उद्दिष्टांच्या अंमलबजावणीस वाढविण्यासाठी सहकार्याच्या कार्यपद्धती निश्चित करणे हा आहे, अशी माहिती चेंबरच्या वतीने देण्यात आली आहे.
महाराष्ट्र चेंबरचे अध्यक्ष संतोष मंडलेचा आणि कश्कदार्याचे राज्यपाल जफर रु झिये यांनी या सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या केल्या. याप्रसंगी व्यासपीठावर चेंबरचे विश्वस्त आशिष पेडणेकर, श्रीमती अलिशर अब्दुवालिएव, गुंतवणूक आणि परराष्ट्र व्यापार उपमंत्री ओयबिक शागाझातोव, कश्कदार्यचे उपराज्यपाल आणि के वांग तसेच कश्कदार्य प्रदेश सरकारचे वरिष्ठ सल्लागार उपस्थित होते.
संतोष मंडलेचा यांनी, या सामंजस्य करारामुळे दोन्ही क्षेत्रांमधील व्यापार मजबूत होऊन व्यापार संबंधांच्या विकासासाठी एक व्यावहारिक चौकट स्थापित होईल, असा विश्वास व्यक्त केला. राज्यपाल जफर रुझिये यांनी महाराष्ट्र चेंबरच्या प्रतिनिधी मंडळाचे आभार मानले. महाराष्ट्र चेंबर आणि कश्कदार्य प्रदेश, उझबेकिस्तान येथे स्थित असलेल्या लघु, मध्यम उद्योगासमवेत व्यवसाय संधी शोधण्यासाठी बीटूबीच्या बैठका झाल्या. त्यातही सकारात्मक चर्चा झाली.
याप्रसंगी सदस्य मनप्रीत नेगी, सुनीता फाल्गुणे, श्रीकृष्ण परब, ओमप्रकाश अग्रवाल, श्रीमती स्मिता मंडलेचा, श्रीमती दीपलक्ष्मी पेडणेकर, सुरेंद्र पाटील, राजेंद्र जाखडी, डॉ. शामसुंदर चौघुले, श्रीमती रेणु अग्रवाल, राधिका परब आदी उपस्थित होते.