शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

महाविकास आघाडी अन् महायुतीचे कार्यकर्ते भिडले; पैसे वाटपाच्या संशयावरुन दुसऱ्यांदा राडा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2024 13:27 IST

Maharashtra Assembly Election 2024 : पूर्व विधानसभा मतदारसंघातील वेताळबाबा मंदिर लगत असलेल्या एका बंगल्यात पैसे वाटप सुरू असल्याकारणाने महाविकास आघाडी व महायुतीच्या कार्यकर्ते रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास पंचवटीत समोरासमोर भिडले

नाशिक - पूर्व विधानसभा मतदारसंघातील वेताळबाबा मंदिर लगत असलेल्या एका बंगल्यात पैसे वाटप सुरू असल्याकारणाने महाविकास आघाडी व महायुतीच्या कार्यकर्ते (दि.१८) रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास पंचवटीत समोरासमोर भिडले. यामुळे रात्री पंचवटीतील चार हत्ती पुलाच्या भागात तणावाचे वातावरण काही काळ निर्माण झाले होते. यावेळी झालेल्या दगडफेकीच्या घटनेत दोन मोटारीचे नुकसान झाले. पूर्व विधानसभा मतदारसंघात असा प्रकार दुसऱ्यांदा घडला. घटनेची माहिती मिळताच पंचवटी पोलिसांनी धाव घेत परिस्थितीवर नियंत्रण मिळविले.

पंचवटीतील चार हत्ती पुलालगत असलेल्या वेताळबाबा मंदिराजवळ एका माजी नगरसेवकाच्या बंगल्यात उमेदवाराद्वारे पुरविणात आलेल्या रकमेतून पैसे वाटप केले आत असल्याचा संशय प्रतिस्पर्धी उमेदवाराच्या कार्यकर्त्यांनी घेतला, यावेळी पुलावर उभ्या असलेली मोटार (एमएच१७ जेएम ७६००) आणि दुसरी मोटार (एमएच२० एएस २८२५० समाजकंटकांकडून फोडण्यात आली. या घटनेबाबत रात्री उशिरापर्यंत पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

मतदारसंघात मोठा फौजफाटा तैनात

पूर्व विधानसभा मतदारसंघात दुसऱ्यांदा राजकीय राडा झाल्यामुळे आता मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. ऐन मतदानाच्या या तोंडावर या मतदारसंघात दोन प्रतिस्पर्धी पक्षांचे कार्यकर्ते समोरासमोर आल्याने पुन्हा तणावाची स्थिती निर्माण झाली होती. 

गुरुवारीही घडली होती घटना...

गणेश गीते यांचा भाऊ गोकुळ गीते यांच्या वाहनांवर दगड फेकण्यात आल्याने हिरावाडीत परिस्थिती तणावपूर्ण बनली होती. या घटनाला चार दिवस होत नाही तोच पुन्हा सोमवारी रात्री कार्यकत्यांचे दोन गट समोरासमोर येऊन तुंबळ हाणामारीव दगडफेकीची घटना चढ़ल्याने पंचवटीतही संताप व्यक्त केला जात आहे.

चार हत्ती चौका परिसरात पैसे वाटप करण्यात येत असल्याने स्थानिक नागरिकांनी त्यास आक्षेप घेतला. यावेळी पैसे वाटप करणाचा दोघांना वाचविण्यासाठी दोन मोटारीतून काही लोक याठिकाणी आले. त्यामुळे रहिवासी मोठ्या संख्येने घराबाहेर पडले आणि लोकांशी वाद घालण्यास सुरुवात केली. भाजपा कार्यकर्त्यांचा या घटनेशी संबंध नाही. - राहुल ढिकले, उमेदवार

पंचवटी परिसरात दोन गटांमध्ये हाणामारी होत असत्याची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. जमावाला पांगविले. तसेच काही संशयितांची धरपकड रात्री उशिरापर्यंत सुरू होती. याबाबत अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. - मधुकर कड, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, पंचवटी 

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४NashikनाशिकPoliticsराजकारणnashik-east-acनाशिक पूर्व