महाराणा प्रताप सेवा संस्था
By Admin | Updated: June 2, 2014 23:52 IST2014-06-02T08:56:10+5:302014-06-02T23:52:16+5:30
नाशिक : महाराणा प्रताप सेवा संस्था व भाजपा पिंपळचौक शाखेच्या वतीने बबलूसिंह परदेशी यांच्या अध्यक्षतेखाली महाराणा प्रताप यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी महाराणा प्रताप यांच्या प्रतिमेस अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमास शहर उत्सव समिती अध्यक्ष प्रल्हादसिंग पवार, भाजपा शहराध्यक्ष लक्ष्मण सावजी, सुहास फरांदे, सुरेश पाटील, डॉ. राहुल अहेर, बाळासाहेब सानप, उपमहापौर सतीश कुलकर्णी, गणेश कांबळे, रामसिंग बावरी, भद्रकाली पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रमेश पाटील, लक्ष्मी ताठे, हजेरीलाल वर्मा, पुष्पा शर्मा, आशिष नहार, मिलिंद राजपूत, विजय मोहिते आदि उपस्थित होते.

नवचैतन्य सामाजिक संस्था
नाशिक : राजमाता पुण्यश्लोक अहल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त सावतानगर येथील पुतळ्याजवळ कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमप्रसंगी नवचैतन्य शैक्षणिक व सामाजिक संस्थेचे उपाध्यक्ष सुनील सोनवणे व अमोल गवळी यांच्या हस्ते अहल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. गवळी यांनी अहल्यादेवीच्या जीवनकार्याचा परिचय करून दिला. यावेळी राजेंद्र शिंदे, निखिल जाधव, दत्तू चिखले, किशोर सरोदे, सुलक्ष फाउंडेशनचे पंकज कुवर, संतोष पारखे, मंगेश सोनवणे, मनोज पाटील, संदीप सूर्यवंशी आदि उपस्थित होते. सूत्रसंचालन भूषण सोनवणे यांनी, तर आभार सुनील सोनवणे यांनी मानले.
आपलं वाचनालय
नाशिक : शिवसेना पंचवटी विभाग व आपलं सार्वजनिक वाचनालय यांच्या संयुक्त विद्यमाने अश्वमेघनगर या ठिकाणी महाराणा प्रताप व अहल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त आदरांजली वाहण्यात आली. याप्रसंगी पंचवटी विभाग प्रमुख व वाचनालयाचे अध्यक्ष हरिभाऊ काळे, ग्रंथपाल, यतिश भानू, राहुल सोळसे, विश्वास लचके, नितीन मोरे, सूरज बोरसे, सागर धात्रक, रितेश सोळसे, दीप ठाकरे, राजू आंबेकर, संतोष राजगुरू, संतोष लचके, सोनू बच्छाव आदिंसह नागरिक, वाचक, सभासद उपस्थित होते.