महंत सुकेणेकर बाबा यांचे निधन
By Admin | Updated: March 29, 2017 10:44 IST2017-03-29T10:44:04+5:302017-03-29T10:44:04+5:30
श्री क्षेत्र मौजे सुकेणे येथील दत्त मंदिराचे आधार स्तंभ प.पु.महंत श्री सुकेणेकर बाबा यांचे बुधवारी पहाटे निधन झाले. ते 105 वर्षांचे होते.

महंत सुकेणेकर बाबा यांचे निधन
>ऑनलाइन लोकमत
नाशिक, दि. 29 - श्री क्षेत्र मौजे सुकेणे येथील दत्त मंदिराचे आधार स्तंभ प.पु.महंत श्री सुकेणेकर बाबा यांचे बुधवारी पहाटे निधन झाले. ते 105 वर्षांचे होते. महंत सुकेणेकरबाबा या नावाने ते देशभरातील महानुभाव पंथात ते प्रसिद्ध होते. नाशिकसह राज्यभरातील महानुभावपंथीय मंदिरे ,आश्रम यांच्या उभारणीत व पंथीय साहित्य प्रसार व प्रचारात त्यांनी त्यांचे उभे आयुष्य घालविले. राज्यासह पंजाब, मुंबई, गुजरात या भागात सुकेणेकर बाबांचा शिष्य परिवार आहे.
गेल्या दीड वर्षांपासून त्यांची प्रकृती खालावली होती. वृद्धापकाळाने त्यांचे बुधवारी पहाटे दत्त मंदिरातील निवासस्थानी निधन झाले. त्यांच्या निधनामुळे राज्यातील महानुभाव पंथात शोककळा पसरली आहे. बुधवारी सायंकाळी 5 वाजता नाशिकजवळील मौजे सुकेणे येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार आहेत.