महंत नरेंद्रगिरी महाराज यांचा घातपातच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2021 12:04 AM2021-09-24T00:04:14+5:302021-09-24T00:07:05+5:30

त्र्यंबकेश्वर : अखिल भारतीय अखाडा परिषदचे अध्यक्ष महंत नरेंद्रगिरी महाराज यांचा प्रयागराज येथे झालेला संशयास्पद मृत्यू हा घातपातच असून, ...

Mahant Narendragiri Maharaj's assassination | महंत नरेंद्रगिरी महाराज यांचा घातपातच

त्र्यंबकेश्वर येथे आयोजित शोकसभेत बोलताना महंत सागरानंद सरस्वती. समवेत उपस्थित साधू-महंत.

Next
ठळक मुद्देसागरानंद सरस्वती : त्र्यंबकेश्वरी श्रद्धांजली सभेचे आयोजन

त्र्यंबकेश्वर : अखिल भारतीय अखाडा परिषदचे अध्यक्ष महंत नरेंद्रगिरी महाराज यांचा प्रयागराज येथे झालेला संशयास्पद मृत्यू हा घातपातच असून, सीबीआयने तपास करून दोषींवर कठोर कारवाई करावी, हीच खरी त्यांना श्रद्धांजली ठरेल, असे प्रतिपादन षड्दर्शन आखाडा परिषदेचे अध्यक्ष महंत सागरानंद सरस्वती महाराज यांनी त्र्यंबकेश्वर येथे केले.

ब्रह्मलीन महंत नरेंद्रगिरी महाराज यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी अखिल भारतीय अखाडा परिषद त्र्यंबकेश्वरच्या वतीने गुरुवारी (दि.२३) रोजी ब्रह्मदर्शन आश्रम येथे सकाळी श्रद्धांजली सभा आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी सागरानंद सरस्वती बोलत होते.
याचवेळी प्रख्यात आयुर्वेद तज्ज्ञ ब्रह्मलीन महंत शिवानंद महाराज तथा भैया बाबा यांचा प्रथम पुण्यतिथी सोहळा ब्रह्मदर्शन आश्रम येथे झाला. त्याला जोडूनच श्रद्धांजली सभा पार पडली. यावेळी त्र्यंबकेश्वरमधील दहा आखाडे, मठ, आश्रम यांचे साधू-महंत मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी अनेक साधू-महंतांनी आपल्या भावनांना वाट मोकळी करुन दिली. अनेक वक्त्यांनी प्रख्यात आयुर्वेद तज्ज्ञ ब्रह्मलीन महंत शिवानंद महाराज तसेच ब्रह्मलीन स्वामी नरेंद्रगिरी महाराज यांच्या कार्याचा गौरव करून स्वामी नरेंद्रगिरी महाराज यांच्या निधनास कारणीभूत असलेल्या दोषींना कडक शासन करण्याची मागणी केली.

महंत गणेशानंद महाराज, नगराध्यक्ष पुरुषोत्तम लोहगावकर, माजी नगराध्यक्ष कैलास घुले, जेष्ठ पत्रकार विश्वास देवकर यांच्यासह अनेक साधू-महंतांनी आपले विचार व्यक्त केले. यावेळी कैलास मठाचे स्वामी संविदानंद सरस्वती महाराज, पंचमुखी हनुमान मंदिराचे महंत भक्तिचरणदास महाराज, निरंजनी आखाड्याचे ठाणापती धनंजयगिरी, आनंद आखाड्याचे सेक्रेटरी धनराजगिरी, स्वामी गणेशानंद सरस्वती, स्वामी सर्वानंद सरस्वती, अग्नी आखाड्याचे दुर्गानंद बह्मचारी, नया उदासीन आखाड्याचे ठाणापती स्वामी गोपालदासजी,जुना आखाड्याचे सेक्रेटरी सुखदेवगिरी, ठाणापती विष्णुगिरी, निर्मल आखाडा ठाणापती महंत राजेंद्र सिंहजी, बडा उदासीन आखाड्याचे ठाणापती बालकमुनी, आवाहन आखाडा ठाणापती धरमपुरी, स्वामी दिपेंद्रगिरी, अन्नपूर्णा आश्रमाचे दिव्यानंद महाराज, ब्रह्मदर्शन आश्रमाचे रामनंद महाराज यासह साधू-महंत, नगरसेवक श्यामराव गंगापुत्र, सागर उजे, लक्ष्मीकांत थेटे, प्रवीण सोनवणे आदींसह भाविक भक्त उपस्थित होते.

आज नगर परिषदेत शोकसभा
त्र्यंबकेश्वरच्या नागरिकांच्या वतीने शुक्रवार दिनांक २४ रोजी दुपारी ४ वाजता महंत नरेंद्रगिरी महाराज यांना श्रद्धांजली अपर्ण करण्यासाठी नगर परिषदेच्या सभागृहातही शोकसभेचे आयोजन करण्यात आले आहे.

यावेळी नागरिकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन ज्येष्ठ नेते सुरेश गंगापुत्र, नगराध्यक्ष पुरुषोत्तम लोहगावकर, पुरोहित संघ अध्यक्ष प्रशांत गायधनी यांनी केले आहे.

 

Web Title: Mahant Narendragiri Maharaj's assassination

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.