शहरं
Join us  
Trending Stories
1
सारथी संस्थेतील पायऱ्यांवरील पाणी मुरत नाही; अजित पवारांच्या नाराजीवर पीडब्ल्यूडीची धावाधाव
2
Jagannath Yatra: जगन्नाथ यात्रेला गालबोट! पुरीतील गुंडीचा मंदिराजवळ चेंगराचेंगरी, तीन भाविकांचा मृत्यू, १० जखमी
3
पवार कुटुंबात यंदा दोन विवाहसोहळे! युगेंद्र पवारांचेही ठरले, सुप्रिया सुळेंनी होणाऱ्या सुनेचे नाव सांगितले...
4
तरण्या-ताठ्या मुलामुलींचं हृदय का होतंय म्हातारं? शेफाली जरीवालाच्या निधनामुळे पुन्हा चर्चा
5
साप्ताहिक राशीभविष्य: काहींना नवीन संधी मिळेल, 'या' राशींना अचानक धनलाभ होईल
6
Ajit Pawar: हिंदी सक्ती ते ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चांपर्यंत; अजित पवार स्पष्टच बोलले!
7
२ लग्न करणाऱ्या 'कांटा लगा गर्ल'ची कोट्यवधींची संपत्ती कोणाला मिळणार? कोण आहे कायदेशीर वारसदार?
8
हरियाणाच्या महिला आयपीएस अधिकारी स्मिती चौधरी यांचे नाशिकमध्ये निधन; पती महाराष्ट्र पोलिसमध्ये अधिकारी
9
Manisha Kayande: एकनाथ शिंदे केवळ भाषणच...; कार्यकर्त्यांसमोर मनीषा कायंदेंनी मनातलं बोलून दाखवलं!
10
"...तर खूप वाईट परिणाम होतील’’, काश्मीर राग आळवत आसिम मुनीरची भारताला पुन्हा धमकी
11
Uttarakhand Cloudburst: उत्तराखंडमध्ये पावसाचा कहर, यमुनोत्री मार्गावर ढगफुटी; अनेक कामगार बेपत्ता, बचावकार्य सुरू
12
बँक FD आणि शेअर बाजाराला पर्याय! पोस्ट ऑफिसच्या 'या' ४ योजनांतून मिळवा बंपर रिटर्न
13
केबिनमधून जळाल्याचा वास, चेन्नईला जाणारं एअर इंडियाचं विमान मुंबईत उतरवलं
14
सिंधू जल वाटप करारासंदर्भात भारताने आंतरराष्ट्रीय लवादाचा निर्णय फेटाळला; पाकिस्तानकडून मात्र निर्णयाचे स्वागत
15
१५-६४ वयोगटातील जगातील ६% लोकसंख्या ड्रग्जच्या विळख्यात, कोकेन ‘श्रीमंतांची फॅशन’
16
४० लाख भाविकांसाठी महाप्रसाद; पुरीमध्ये अदानी फाउंडेशनची सेवा
17
वीज प्रति युनिट १ ते १.३० रुपयांनी महागणार; महाराष्ट्र वीज ग्राहक संघटनेचा दावा
18
अंतराळातून भारताचे तेजस्वी दर्शन; दररोज १६ सूर्योदय, १६ सूर्यास्त पाहातो; अंतराळवीर शुभांशू यांना पंतप्रधानांचा व्हिडीओ कॉल
19
लग्नाचं आमिष दाखवून त्याने ५ वर्षांपासून…, RCBच्या स्टार खेळाडूवर शारीरिक शोषणाचा गंभीर आरोप
20
"तुझ्या कुंडलीत आकस्मिक मृत्यू...", शेफाली जरीवालाबाबत अभिनेत्याने केलेली भविष्यवाणी खरी ठरली

सर्व तीर्थंकरांच्या जयघोषात महामस्तकाभिषेक

By admin | Updated: February 18, 2016 23:39 IST

मांगीतुंगी : भगवान वृषभदेव यांच्या विशालकाय मूर्तीवर विविध रस, पंचामृत, दुग्धाभिषेक

नाशिक : ‘बोलो भगवान वृषभनाथकी जय, बोलो आदिनाथकी जय’, ‘सर्व तीर्थंकरकी जय’ अशा जयघोषात आणि आचार्यगण, मुनीवर, हजारो संत-महात्मे आणि लाखो भाविकांच्या उपस्थितीत मांगीतुंगी येथील भगवान वृषभदेवांच्या विशालकाय मूर्तीचा महामस्तकाभिषेक सोहळ्याला उत्साहात सुरुवात झाली.मांगीतुंगी येथील भगवान वृषभदेव यांच्या १०८ फुटी विशालकाय मूर्तीचा प्राणप्रतिष्ठा सोहळा गेल्या सात दिवसांपासून सुरू असून, गुरुवारी (दि.१८) सकाळी ११ वा. महामस्तकाभिषेक सोहळ्याला हर्षाेल्हासात प्रारंभ झाला. गणिनीप्रमुख ज्ञानमती माताजी, चंदनामती माताजी यांच्या मार्गदर्शनाखाली आणि रवींद्रकीर्ती स्वामी यांच्या कुशल नेतृत्वाखाली या सोहळ्याला सुरुवात झाली. याप्रसंगी आचार्य अनेकांतसागर महाराज, आचार्य पद्मनंदजी महाराज, आचार्य गुप्तीनंदजी महाराज, आचार्य धर्मनंदजी महाराज, आचार्य बालाचार्य जीनसेन महाराज, आचार्य नितानंद सागर महाराज, आचार्य देवसेन महाराज आदि प्रमुख आचार्यांसह विविध जैन संत-महात्म्यांनी धर्मशास्त्रानुसार मंत्रोचारण करीत असतानाच इंद्र-इंद्राणी बनलेल्या साधन भक्तांनी भगवान वृषभदेवांच्या विशालकाय मूर्तीवर पंचामृत अभिषेकाबरोबरच नारळ पाणी, इच्छुकरस (उसाचा रस), दूध, दही, तूप, डाळींब रस, मोसंबी रस, हळदीरस, केशरपाणी आदिंसह विविध औषधी अर्कांनी अभिषेक करण्यात आला. यावेळी आयोजक समिती महामंत्री डॉ. पन्नालाल पापडीवाल, मंत्री सी.आर. पाटील, विजयकुमार जैन, भूषण कासलीवाल, जीवन प्रकाश जैन यांच्यासह लाखो भाविक या सोहळ्यात सहभागी झाले होते. विशेष म्हणजे इ.स. २००६मध्ये श्रवणबेळगोळ येथील भगवान बाहुबलीच्या ५८ फूट विशालकाय मूर्तीच्या अभिषेक सोहळ्यातील प्रमुख कार्यवाहक असलेले वीरेंद्र हेगडे हेदेखील महामस्तकाभिषेक सोहळ्यास प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.