शहरं
Join us  
Trending Stories
1
Ashish Shelar:... तर मुंबईत अजित पवार गटाशी युती करणार नाही, आशिष शेलार यांचा इशारा!
2
आजचे राशीभविष्य - २० नोव्हेंबर २०२५, 'या' राशीच्या व्यक्तींसाठी आज लाभदायी दिवस, शेअर-सट्टा ह्यात धनलाभ होईल
3
Mahayuti: एकनाथ शिंदे दिल्लीत, अजित पवार ‘वर्षा' बंगल्यावर, महायुतीत 'ऑल इज वेल'?
4
Dombivli: डोंबिवलीत भाजप मजबूत, मनसेच्या माजी नगरसेवकांसाठी शिंदेसेनेने टाकले जाळे!
5
Ulhasnagar: पक्षांतर करणाऱ्यांच्या फोटोला आधी फासले काळे; नंतर सन्मानाने स्थान!
6
India- Israel: भारत-इस्रायलचे संबंध आणखी होणार वृद्धिंगत!
7
Andhra Pradesh: आंध्र प्रदेशात सात नक्षलवाद्यांचा खात्मा, ५० जणांना अटक; मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त
8
Palghar: पालघरमध्ये शिक्षकाच्या मारहाणीला घाबरून मुलं लपली जंगलात, मग पुढं काय घडलं?
9
SC: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढे का ढकलत नाहीत? न्यायालयाकडून राज्य सरकारला जाब
10
महायुतीत सारे काही आलबेल? मंत्र्यांच्या नाराजीनंतर शिंदेनी दरे नाही, दिल्ली गाठली; अमित शहांकडे तक्रार...
11
"राजा रघुवंशी प्रमाणे...!" ऑपरेशन सिंदूर'मध्ये पाकिस्तानला धडा शिकवणाऱ्या जवानाला वाटते भीती, 'सोनमसारखं' करण्याची धमकी देतेय पत्नी!
12
माळेगावात तणाव! शरद पवार राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष नितीन तावरे यांच्यावर जीवघेणा हल्ला 
13
₹१०००००००००००००० स्वाहा...! 6 आठवड्यांत क्रिप्टो मार्केट क्रॅश, बिटकॉइन 27% घसरला; गुंतवणूकदारांवर डोकं झोडून घ्यायची वेळ
14
'घातपाताच्या सूत्रधाराला वाचवणाऱ्या सरकारचे संरक्षण नको!' मनोज जरांगेंचा मोठा निर्णय
15
क्रिकेट चाहत्यांना धक्का! विश्वचषकात भारत-पाकिस्तान सामना होणार नाही, आयसीसीने ग्रुप स्टेजसाठी घेतला मोठा निर्णय...
16
KTM च्या बाईकना आग लागण्याचा धोका; Duke मॉडेल माघारी बोलविल्या...
17
एक 'ट्रिप'... एक 'ट्रिक'... अन् उभा राहिला १.५ कोटींचा उद्योग; कोल्हापूरच्या अद्वैतचा नादच खुळा
18
Travel : भारतापासून हजारो मैल दूर वसलाय 'मिनी इंडिया'; दिसायला सुंदर, फिरायला बेस्ट अन् इतिहासही आहे रंजक!
19
"मी अनेक वेळा रात्रीचे जेवण करत नाही, विचार करते...!"; करण जौहरसोबत अगदी मोकळेपणानं बोलली सानिया मिर्झा
20
नवी Honda City पाहिलीत का? कधी येणार; डिझाईन आणि प्लॅटफॉर्मची माहिती लीक झाली...
Daily Top 2Weekly Top 5

महादेवपूर-डंबाळेवाडी- दुगाव रस्ता मोकळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2019 01:10 IST

दोन शेतकऱ्यांच्या वादात रखडलेला शिवरस्ता अखेर २५ वर्षांनंतर मुक्त झाला आहे. या रस्त्यामुळे शेतकरी आणि गावाच्या विकासाचा मार्ग प्रशस्त होणार असून, यासाठी प्रयत्न करणाºया महादेवपूरच्या सरपंचाची मध्यस्थी फलद्रुप ठरली आहे.

गंगापूररोड : दोन शेतकऱ्यांच्या वादात रखडलेला शिवरस्ता अखेर २५ वर्षांनंतर मुक्त झाला आहे. या रस्त्यामुळे शेतकरी आणि गावाच्या विकासाचा मार्ग प्रशस्त होणार असून, यासाठी प्रयत्न करणाºया महादेवपूरच्या सरपंचाची मध्यस्थी फलद्रुप ठरली आहे.  शेतकरी एकत्र आले तर गावाचे चित्र बदलू शकतात, हे सिद्ध करून दाखविणारी ही घटना आहे. नुकतेच महादेवपूर गावचे सरपंच झालेले विलास सांडखोरे यांनी दोन शेतकºयांच्या वादामुळे रखडलेला शिवरस्ता सामंजस्याने मोकळा करवून घेतला आहे. या रस्त्यासंदर्भात दोन शेतकºयांमध्ये टोकाचा वाद असल्याने गावाच्या विकासाला अडचणदेखील निर्माण झाली होती. त्यामुळे विकासाची कामेदेखील खोळंबली होती. अखेर गेल्या २५ वर्षांपासूनचा वाद संपुष्टात आल्याने परिसरातील शेतकरी व गावांना त्याचा फायदा होणार असल्याचे सरपंचांनी सांगितले.  गावातील सरपंच विलास सांडखोरे आणि ग्रामपंचायत सदस्य अलका कैलास डावरे यांनी ही बाब ओळखून रस्त्याचा वाद मिटविण्यासाठी प्रयत्न केले.शेतकºयांचे आर्थिक नुकसान टळणारमहादेवपूर गावातील शिवार रस्ता गेल्या २५ वर्षांपासून भिजत प्रलंबित होता. या रस्त्यामुळे दोन गावांतील अंतर वाढले होते. सदर रस्ता मोकळा व्हावा, असे बहुतेकांना वाटत होते. यासाठी अनेकदा प्रयत्नदेखील झाले. मात्र रस्ता अडवून बसलेल्यांना सांगायचे कुणी? उगाच वादास निमंत्रण नको अशी भीती ग्रामस्थांनादेखील वाटत होती. येथून जाणाºया शेतकºयांना आपला माल बाजारात घेऊन जाताना मोठा चक्कर मारावा लागत असल्याने आर्थिक नुकसान आणि वेळेचा दुरुपयोगदेखील होत होता.कैलास डावरे व राजू डावरे यांनी आपल्या मालकीची जमीन रस्त्याच्या कामासाठी खुली करून दिली. दरम्यान, त्याठिकाणी मोठा रास्ता तयार झाल्यास परिसरातील १०० ते १५० शेतकºयांना त्याचा लाभ होणार आहे. परिणामी गावाचा विकास होणार असल्याने या रस्त्यात ज्या शेतकºयांची जमीन जाणार आहे. त्यांना एकत्र बसवून त्यांच्यातील गैरसमज काढून दोन गावांतील अंतर आणि परिसरातील शेतकºयांचा प्रश्न कशा पद्धतीने सुटेल याविषयी पटवून दिले. रस्ता मोकळा झाल्याने परिसरातील शेतकºयांनी सरपंच व ग्रामपंचायत सदस्यांचा सत्कार करून आभार मानले.

टॅग्स :nashik Jilha parishadनाशिक जिल्हा परिषदsarpanchसरपंच