शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

गीतकार हरेंद्र जाधव यांचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2021 01:40 IST

प्रख्यात गीतकार आणि आंबेडकरी विचारांचे भाष्यकार हरेंद्र हिरामण जाधव यांचे मुंबईत निधन झाले, ते ८८ वर्षांचे होते. त्यांच्या निधनाने आंबेडकरी प्रबोधनाच्या चळवळीची मोठी हानी झाली आहे.

नाशिक : प्रख्यात गीतकार आणि आंबेडकरी विचारांचे भाष्यकार हरेंद्र हिरामण जाधव यांचे मुंबईत निधन झाले, ते ८८ वर्षांचे होते. त्यांच्या निधनाने आंबेडकरी प्रबोधनाच्या चळवळीची मोठी हानी झाली आहे.काही वर्षांपूर्वी त्यांना पक्षाघाताचा झटका आला होता. त्यामुळे ते अंथरुणावरच होते. त्यातून ते सावरू शकले नाहीत. काही दिवसांपासून त्यांची प्रकृती बिघडली होती. शनिवारी (दि.२४) मध्यरात्री त्यांची प्राणज्योत मालवली. मूळचे नाशिक जिल्ह्यातील ओझर मिग गावचे हरेंद्र जाधव हे पेशाने शिक्षक होते. त्यांचे वडील मुंबईत असल्याने त्यांचे आयुष्य मुंबईतच गेले. १६ फेब्रुवारी, १९३३ रोजी जन्मलेले हरेंद्र जाधव यांच्यावर लहानपणापासूनच आंबेडकरी जलशांचा प्रभाव होता. जाधव यांनी बुद्धम् शरणंम् गच्छामी, धम्मंम् शरणंम् गच्छामी..., भीमाच्या धोरणाचा अभिमान पाहिजे, नेता असा आम्हाला गुणवान पाहिजे...., पाहा पाहा मंजुळा, हा माझ्या भीमरायाचा मळा…, तूच सुखकर्ता तूच दुखहर्ता, अवघ्या दिनांच्या नाथा…, माझ्या नवऱ्यानं सोडलीय दारू, बाई देव पावलाय गं..., आता तरी देवा मला पावशील का? सुख ज्याला म्हणतात ते दावशील का? आदी प्रसिद्ध गाणी त्यांनी लिहिलेली आहेत. आतापर्यंत त्यांच्या लेखणीतून शेकडो गीतरचना शब्दांकित झालेल्या आहेत. त्यापैकी त्यांची काही गाणी मुंबईतील सेंटर प्रकाशनाने नऊ भागांत पुस्तकरूपात प्रकाशित केली आहेत. लोकगायक रंजना शिंदे, श्रावण यशवंते, प्रल्हाद शिंदे, विठ्ठल उमप, आनंद शिंदे यांसह अजित कडकडे, सुरेश वाडकर, अनुराधा पौडवाल, बेला सुलाखे, साधना सरगम या प्रतिथयश गायकांनी आणि आंबेडकरी चळवळीतील अनेक शाहिरांनी त्यांची गाणी गायिली आहेत. शिक्षकी पेशात कार्यरत असलेले कवी हरेंद्र जाधव हे लोकशिक्षकही असल्याने, त्यांना आदराने ‘गुरुजी’ या उपाधीने संबोधले जात होते. एक जिज्ञासू, मितभाषी, संयमी, संवेदनशील, परंतु कवी मनाचा चिंतनशील सर्जक अशी त्यांची ओळख प्रचलित राहिलेली आहे. प्रसिद्ध लोककवी व शाहीर वामनदादा कर्डक यांच्याशी त्यांचा विशेष स्नेह होता. त्या स्नेहातूनच नाशिकमध्ये स्थापन झालेल्या ‘महाकवी वामनदादा कर्डक’ प्रतिष्ठानाशी त्यांचे अतूट नाते होते. समतावादी चळवळीशी बांधिलकी जपणारे, आंबेडकरी विचारांचा व चळवळीचा भाष्यकार असलेले कवी हरेंद्र जाधव यांच्या निधनाने आंबेडकरी प्रबोधनाच्या चळवळीची मोठी हानी झालेली आहे. त्यांच्यापश्चात पत्नी शकुंतला, मुलगी तारका असा परिवार आहे. 

टॅग्स :NashikनाशिकDeathमृत्यू