नाशिक : मैत्रिणीने सांगितल्याप्रमाणे एका अनोळखी तरुणीसोबत संपर्क साधून तिने दाखविलेल्या शरीरसुखाच्या आमिषाला बळी पडून पंचवटीतील इंद्रकुंड येथे ठरल्याप्रमाणे गेलेल्या एका आंबटशौकिन तरुणाला युवकांची बेदम मारहाण केल्याची घटना घडली. याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी युवक वाल्मीक अहिरे (२५,रा.कोणार्कनगर) यास त्याच्या एका मैत्रिणीने शारीरिक संबंध प्रस्थापित करण्यासाठी एका युवतीचा संपर्क क्रमांक दिला होता. अहिरे याने त्या युवतीशी संपर्क केला असता, तिने त्यास इंद्रकुंड येथे बोलावून घेत त्याच्याकडून दीड हजार रुपये बळजबरीने काढून घेतले. हॉटेलवर जाण्याचा बनाव करत त्याला गप्पांमध्ये व्यस्त ठेवले. यावेळी तिने संशयित विकी रमेश पाथरे (२८,रा. मखमलाबाद), यश दिलीप ललवाणी (१९,रा.मालेगाव स्टॅन्ड), सनी रमेश पाथरे (२८), चंदन सेवाराम नागरानी (२७), यांना बोलावून घेतले. या टोळक्याने वाल्मीक यास शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांसह लाकडी दंडुक्याने मारहाण केली. त्याच्या आय-१० कारची (एम.एच१५ सीडी २९७६) तोडफोड केल्याचे पोलिसांना दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी संशयित टोळक्यासह तरुणीविरोधात पोलिसांनी विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.
शरीरसुखाचा मोह युवकाला भोवला; टोळक्याकडून मारहाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2021 01:24 IST
मैत्रिणीने सांगितल्याप्रमाणे एका अनोळखी तरुणीसोबत संपर्क साधून तिने दाखविलेल्या शरीरसुखाच्या आमिषाला बळी पडून पंचवटीतील इंद्रकुंड येथे ठरल्याप्रमाणे गेलेल्या एका आंबटशौकिन तरुणाला युवकांची बेदम मारहाण केल्याची घटना घडली. याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शरीरसुखाचा मोह युवकाला भोवला; टोळक्याकडून मारहाण
ठळक मुद्देयुवतीकडून दगाफटका : पंचवटीतील घटना