शहरं
Join us  
Trending Stories
1
मृत्युनंतर महिलेच्या मालमत्तेवर कुणाचा हक्क? माहेर की सासर? हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय!
2
आजचे राशीभविष्य, २५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती होईल, प्रवास आनंददायी होईल; पण वाहन चालवताना काळजी घ्या!
3
'आप'ला राज्यसभेत खिंडार; दहापैकी ७ खासदारांना घेऊन राघव चड्ढा भाजपमध्ये, पक्ष सोडताना म्हणाले...
4
Marathi Compulsion: मुजोरी केली तर थेट परवानाच रद्द करणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा इशारा
5
एका मच्छराने घेतला राज्यात २७ रुग्णांचा जीव, सार्वजनिक आरोग्य विभागाकडून आकडेवारी जारी
6
मराठी सक्तीवरून राजकीय संघर्ष सुरू, शिंदेसेना- मनसे आमनेसामने, दहिसरमध्ये नेमकं काय घडलं?
7
सर्व प्रवासी वाहनांसाठी लागू होणार मराठी सक्ती, परिवहन विभागाने टाकली कायदेशीर पावले
8
Bhandup: ‘हाय’ अन् ‘टाटा बाय-बाय’वरून वाद; वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात
9
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
10
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
11
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
12
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
13
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
14
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
15
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
16
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
17
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
18
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
19
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
20
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
Daily Top 2Weekly Top 5

लाल कांद्याला सर्वात नीचांकी भाव

By admin | Updated: March 1, 2016 22:45 IST

लासलगाव बाजार समिती : परराज्यातून आवक वाढल्याचा फटका

लासलगाव : येथील बाजार समितीत उन्हाळ कांद्याची थोड्या प्रमाणात आवक सुरू झालेली असली तरीही लाल कांद्याला गत दोन वर्षांच्या तुलनेत प्रतिक्विंटल नीचांकी सरासरी भाव मिळत आहे. गुजरात आणि कर्नाटक राज्यातूनही देशभरात कांद्याची मोठ्या प्रमाणात आवक होत असल्याने परिणामी लासलगाव कांद्याची मागणी कमी झाली आहे.उन्हाळ कांद्याला सध्या सरासरी ६७५ रु पये प्रतिक्विंटल भाव मिळत आहे. हाच दर फेब्रुवारी २०१४मध्ये मिळाला होता. सध्या बाजार समितीत लेट खरीप कांद्याची आवक होत असून, या कांद्याची २०-२५ दिवस टिकवण क्षमता असल्याने शेतकऱ्यांना हा कांदा साठवता येत नाही. विकण्याशिवाय पर्याय नाही. मिळेल त्या दराने कांदा विकावा लागतो. सध्या जिल्ह्याात सर्व बाजार समितीत लाल कांद्याची आवक मोठ्या प्रमाणात झाली आहे. मागणीच्या तुलनेत पुरवठा अधिक झाल्याने भाव घसरत आहे. लासलगाव बाजार समितीत दररोज १८ ते २१ हजार क्विंटल आवक होत आहे. गुजरात आणि कर्नाटक राज्यातील कांद्याची देशभरात आवक झाल्याने लासलगावच्या कांद्याला असलेली मागणी घटली आहे. चाकण आणि सोलापूर या भागात नवीन उन्हाळ कांदा येत असल्याने या कांद्याची टिकवण क्षमता जास्त असल्याने व्यापारी या कांद्याला पसंती देत आहेत. त्यामुळे येणाऱ्या दिवसात कांद्याचा भाव आणखी घसरेल, अशी शक्यता जाणकर व्यक्त करत आहेत. सध्या मिळत असलेल्या भावात उत्पादन खर्चही निघत नसल्याने शेतकरीवर्गात निराशा दिसत आहे. लासलगाव बाजार समितीत उन्हाळ कांद्याची आवक सुरू झाली असून, रोज ५० ते १०० क्विंटलची आवक होत आहे. मार्चअखेरपर्यंत आवक वाढेल, अशी माहिती देण्यात आली. आज लासलगाव बाजार समितीत लाल कांद्याला किमान ४०० रुपये, सरासरी ७०० रुपये तर कमाल ८०० रु पये प्रतिक्विंटल भाव मिळाला, तर उन्हाळ कांद्याला किमान ७००, सरासरी ८५० तर कमाल ९७६ रुपये भाव मिळाला. (वार्ताहर)