देवळा : तालुक्यात वीज वितरण कंपनीमार्फत होणारा वीजपुरवठा कमी दाबाने होत असल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. सदर वीजपुरवठा सुरळीत करावा अन्यथा आंदोलन छेडण्याचा इशारा सरस्वतीवाडी व माळवाडी येथील नागरिकांनी दिला आहे.शेतीपंपासाठी होणारा वीजपुरवठा हा अतिशय कमी दाबाने होत अल्यामुळे पंप जळणे, स्टार्टर चालू न होणे, पाणी कमी उचलणे, केबल जळणे, ट्रान्सफार्मर जळणे अशा समस्यांना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे शेतकरी मोठ्या प्रमाणावर त्रस्त झाले आहेत. कांदा पीक काढणीला आले असून पाणीपुरवठा सुरळीत नसल्याने तो आता जळण्याच्या मार्गावर आहे. महावितरणने वीजपुरवठा लवकरात लवकर सुरळीत करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अन्यथा शेतकरी रस्त्यावर उतरून आंदोलन करतील, असा इशारा देणारे निवेदन तालुक्यातील शेतकऱ्यांनी महावितरण कंपनीला दिले आहे.यावेळी विनायक आहेर, पंकज आहेर, राजेंद्र आहेर, चंद्रकांत आहेर, जगदीश मेधने, कैलास मेधने, विलास मेधने, गणेश मेधने, विलास आहेर, योगेश आहेर, विनायक आहेर आदीसह शेतकरी उपस्थित होते.
कमी दाबाचा वीजपुरवठा; महावितरणविरोधी संताप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 01:07 IST
देवळा : तालुक्यात वीज वितरण कंपनीमार्फत होणारा वीजपुरवठा कमी दाबाने होत असल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. सदर वीजपुरवठा सुरळीत करावा अन्यथा आंदोलन छेडण्याचा इशारा सरस्वतीवाडी व माळवाडी येथील नागरिकांनी दिला आहे.
कमी दाबाचा वीजपुरवठा; महावितरणविरोधी संताप
ठळक मुद्देदेवळा तालुका : शेतकऱ्यांचा आंदोलनाचा इशारा