‘त्या’ प्रियकराच्या बहिणीला पोलीस कोठडी

By Admin | Updated: June 2, 2017 01:44 IST2017-06-02T01:44:31+5:302017-06-02T01:44:54+5:30

नाशिकरोड : प्रेयसीचा खून करून एकलहरा रोडवर तिचा मृतदेह जाळून टाकण्यास मदत केल्याप्रकरणी प्रियकर रोहित याची बहीण मोहिनी पाटीललादेखील पोलिसांनी अटक केली आहे

'That' lover's sister gets a police cell | ‘त्या’ प्रियकराच्या बहिणीला पोलीस कोठडी

‘त्या’ प्रियकराच्या बहिणीला पोलीस कोठडी

 लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिकरोड : सातपूर येथे प्रेयसीचा खून करून एकलहरा रोडवर तिचा मृतदेह जाळून टाकण्यास मदत केल्याप्रकरणी प्रियकर रोहित याची बहीण मोहिनी पाटीललादेखील पोलिसांनी अटक केली आहे. मोहिनी हिस नाशिकरोड न्यायालयासमोर उभे केले असता सोमवारपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे.
सातपूर अशोकनगर येथील रोहित रवींद्र पाटील व दिंडोरीरोड कलानगर म्हाडा कॉलनीतील हर्षदा भास्कर अहिरे या दोघांचे गेल्या चार वर्षांपासून प्रेमसंबंध होते. सोमवारी दुपारी रोहित व हर्षदा एकमेकांना भेटल्यानंतर ते रोहितच्या घरी गेले. रोहितच्या बहिणीचे लग्न काही दिवसांनी होते. हर्षदा व रोहितमध्ये वादविवाद झाला. संतप्त झालेल्या रोहितने चाकूने वार केल्याने ती जागीच गतप्राण झाली. रात्री एक-दीड वाजता एका सुटकेसमध्ये मयत हर्षदाचा मृतदेह ठेवून दुचाकीवरून एकलहरा येथील किर्लोस्कर कंपनीच्या कम्पाउंडलगत आणून तो पेटवून दिला.
न्यायालयाने पोलीस कोठडी दिल्यानंतर बुधवारी पोलिसांनी संशयित रोहित याची कसून चौकशी केली असता हर्षदाचा खुूा केल्यानंतर बहीण मोहिनीला मोबाइलवर संपर्क साधून बोलावून घेतले. त्यानंतर रोहितने मोहिनीच्या मदतीने घरातील रक्त पुसून सर्व कपडे जाळून टाकले. तसेच गटारीत चाकू व हर्षदाचा मोबाइल टाकून दिला. त्यानंतर रात्री माईस्ट्रो दुचाकीवर रोहितच्या मागे मोहिनी मयत हर्षदाचा मृतदेह असलेली सुटकेस घेऊन बसली होती. खुनाच्या गुन्ह्यात व पुरावा नष्ट करण्यास मदत केल्याप्रकरणी मोहिनी रवींद्र पाटील (वय २३) हीला नाशिकरोड पोलिसांनी अटक करून गुरुवारी न्यायालयासमोर उभे केले असता पाच दिवस (५ जूनपर्यंत) पोलीस कोठडी दिली आहे.

Web Title: 'That' lover's sister gets a police cell