प्रियकराने भर रस्त्यात प्रेयसीच्या अंगावर ओतले पेट्रोल

By Admin | Updated: October 27, 2016 17:09 IST2016-10-27T17:09:15+5:302016-10-27T17:09:15+5:30

वेळ सात्री साडेनऊ वाजेची. ठिकाण सिटी सेंटर मॉल, उंटवाडी. प्रेयसीने दुसऱ्या मुलासोबत विवाह केल्याचा राग आल्याने प्रियकराने प्रेयसीला अडवून विचारणा करत हाताने मारहाण केली

Lover poured petrol on the whole of the road | प्रियकराने भर रस्त्यात प्रेयसीच्या अंगावर ओतले पेट्रोल

प्रियकराने भर रस्त्यात प्रेयसीच्या अंगावर ओतले पेट्रोल

ऑनलाइन लोकमत
नाशिक, दि. २७ - वेळ सात्री साडेनऊ वाजेची. ठिकाण सिटी सेंटर मॉल, उंटवाडी. प्रेयसीने दुसऱ्या मुलासोबत विवाह केल्याचा राग आल्याने प्रियकराने प्रेयसीला अडवून विचारणा करत हाताने मारहाण केली आणि पेट्रोल अंगावर ओतून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना नाशिकमध्ये गेल्या बुधवारी (दि.२६) रात्रीच्या सुमारास घडली.

याबाबत पोलीसांनी दिलेली माहितीपिडित विवाहिता व संशयित पंकज यांचे काही वर्षांपुर्वी प्रेमसंबंध होते. त्यामुळे पिडित महिला व संशयित एकमेकांना ओळखत असून संशयिताने तु दुसऱ्या मुलासोबत विवाह का केला असा प्रश्न करत महिलेला मारहाण केली आणि पेट्रोल अंगावर टाकले, असे पिडित महिलेने फिर्यादीत म्हटले आहे. गंगापूर पोलीस ठाण्यात पिडित विवाहितेने संशयित आरोपी पंकज साहेबराव आहिरे (रा.खुटवडनगर, सिडको) याच्याविरोधात गुन्हा दखल केला आहे. याप्रकरणी गंगापूर पोलीसांनी संशयिताला अटक केली आहे

Web Title: Lover poured petrol on the whole of the road