प्रियकराने प्रेयसीचा विवाह मोडला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2021 04:12 IST2021-07-15T04:12:33+5:302021-07-15T04:12:33+5:30

गंगापूर रोडवरील बारदान फाटा येथे रिक्षाच्या प्रतीक्षेत उभ्या असलेल्या एका १९ वर्षीय युवतीचा तिचा प्रियकर संशयित अजिज सईद शेख ...

The lover broke up the marriage of the beloved | प्रियकराने प्रेयसीचा विवाह मोडला

प्रियकराने प्रेयसीचा विवाह मोडला

गंगापूर रोडवरील बारदान फाटा येथे रिक्षाच्या प्रतीक्षेत उभ्या असलेल्या एका १९ वर्षीय युवतीचा तिचा प्रियकर संशयित अजिज सईद शेख (रा. वडाळा) याने तेथे येऊन रविवारी (दि. ११) विनयभंग केला. या दोघांमध्ये प्रेमसंबंध होते. मात्र, कालांतराने तिने त्याच्याशी संबंध तोडले होते. रविवारी पीडित युवती गंगापूर रोडवरील बारदान फाटा येथे उभी असताना संशयित अजिज हा तेथे आला व त्याने पीडितेचा विनयभंग केला. तसेच पीडितेचे ज्या मुलासोबत लग्न जमले होते त्या तरुणाला गाठून त्यांच्या प्रेमसंबंधाची माहिती देत खोटेनाटे आरोप केल्याचे फिर्यादीत पीडितेने म्हटले आहे. त्यामुळे त्या तरुणाने पीडितेसोबत जमलेला विवाह मोडला. याप्रकरणी गंगापूर पोलिसांनी विनयभंगाचा गुन्हा दाखल करून संशयितास ताब्यात घेतले आहे.

एका प्रियकराने थेट प्रेयसीचे घर गाठून तिच्या बहिणीचा विनयभंग केल्याची घटना पंचवटी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. पीडितेने फिर्यादीनुसार संशयित रोहन राजेंद्र साळवे (२१, रा. वडाळा गाव) याचे तिच्या बहिणीसोबत प्रेमसंबंध होते. शुक्रवारी (दि. ९) रात्रीच्या सुमारास संशयित रोहन त्यांच्या घरी आला व पीडितेकडे तिच्या बहिणीबाबत चौकशी केली. त्यावेळी पीडितेने ‘तू आमच्या घरी का आलास’ अशी विचारणा केली. त्याचा राग आल्याने रोहनने पीडितेला शिवीगाळ करत विनयभंग केला तसेच प्रेयसीचे दुसरीकडे लग्न होऊ देणार नाही, अशी धमकी दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी पीडितेने पंचवटी पोलीस ठाण्यात रोहनविरोधात फिर्याद दिली असून, पोलिसांनी त्यास ताब्यात घेतले आहे.

Web Title: The lover broke up the marriage of the beloved