Love of lovers is important in making artist | कलाकार घडविण्यात रसिकांचे प्रेम महत्त्वाचे
‘गाणारा तबला’ या पुस्तकाचे प्रकाशन करताना ख्यातनाम तबलावादक नयन घोष यांच्यासह अविराज तायडे, प्रल्हाद आवलसकर, कमलाकर वारे, ओंकार गुलवाडी, नाना मुळ््ये, बापूसाहेब पटवर्धन, लोकेश शेवडे, राम बोरगावकर, मनीषा अदिकारी राघवीर अधिकारी आदी.

ठळक मुद्देनाना मुळ्ये : ‘तबला चिल्ला’ अखंड नाद संकीर्तनास कुसुमाग्रज स्मारकात सुरुवात;‘गाणारा तबला’चे प्रकाशन

नाशिक : कोणत्याही कला क्षेत्रातील कलाकार कष्टांसोबतच रसिकांचे प्रेम महत्त्वाचे आहे, कलाकाराने कितीही परिश्रम घेऊन स्वत:ला तयार केले तरी जोपर्यंत रसिकांची दाद कलाकृतीला मिळत नाही तोपर्यंत कलाकृती यशस्वी होत नाही. याच विचारानुसार कलेच्या प्रवासात आपल्याला घडविण्यातही रसिकांचा मोठा वाटा असल्याचे असल्याचे मत नादसाधक पंडित शशिकांत (नाना) मुळ्ये यांनी व्यक्त केले.
आदिताल तबला अकादमीतर्फे कुसुमाग्रज स्मारक येथे शुक्रवारी (दि.११) नादसंकीर्तन २०१९ सोहळ्यास प्रारंभ झाला. यावेळी शंतणू घुणे यांनी घेतलेल्या प्रकट मुलाखतीला उत्तर देताना नाना मुळ््ये यांनी तबल्याचा नाद हा माझा श्वास बनल्याचे सांगतानाच आपल्या कलाप्रवासातील विविध प्रसंग उलगडून सांगितले. प्रारंभी दीपप्रज्वलन करण्यात आले.
यावेळी ज्येष्ठ तबला वादक बापूसाहेब पटवर्धन, ओंकार गुलवाडी, अशोक कटारीया, कमलाकर वारे, राघवीर अधिकारी, मनीषा अधिकारी आदी उपस्थित होते. त्यानंतर प्रथम सत्रात बालतबला वादक विहंग मुळ्ये याने एकल तबलावादन सादर केले. तसेच आदिताल अकादमीचे रसिक कुलकर्णी यांचेही यावेळी तबलावादन झाले. याच सत्रात तबलावादक पंडित शशिकांत (नाना) मुळ्ये यांच्यावरील प्रल्हाद आवलसकर लिखित ‘गाणारा तबला’ या पुस्तकाचे ख्यातनाम तबला वादक नयन घोष यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.
पुस्तक प्रकाशनानंतर नाना मुळ्ये यांची प्रकट मुलाखत रंगली. सत्राचा शेवट मुंबईचे प्रसिद्ध तबला वादक नयन घोष यांच्या तबलावादनाने झाला.

Web Title: Love of lovers is important in making artist

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.