Love colorful youthfulness ... | प्रेमरंगात रंगली तरुणाई...

प्रेमरंगात रंगली तरुणाई...

ठळक मुद्देव्हॅलेंटाइनचा उत्साह : गुलाबी स्वप्नांना बहर

नाशिक : प्रेमरंगाच्या उत्सवात गुलाबी रंगाने रंगलेल्या तरुणाईने आपल्या प्रेमाची कबुली देतानाच गुलाबपुष्पाचे आदानप्रदान केले. मनातील अबोल भावनांना आज शब्दसाज चढल्याने अनेकांच्या प्रेमभावनांची वाट मोकळी झाली. प्रेमाचा हा उत्सव शहर परिसरात सर्वत्र उत्साहात सुरू होता. विशेषत: कॉलेजरोडवर प्रेमाचा रंग अधिकच गहिरा झाला होता. कॉलेजरोडसह गंगापूररोडला तरुणाईमध्ये अमाप उत्साह दिसून आला. आपल्या आवडत्या व्यक्तीविषयीची मनातील भावना व्यक्त करीत तरुण-तरुणींनी व्हॅलेंटाइन डे स्पेशल केला. व्हॅलेंटाइन डे चे स्पेशल सेलिब्रेशन शहराच्या बाहेरील पिकनिक स्पॉटवर साजरे करण्यात आले. यासाठी विशेष कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

Web Title: Love colorful youthfulness ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.