आठवडे बाजार लिलाव स्थगित झाल्याने नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2020 00:13 IST2020-05-17T22:08:42+5:302020-05-18T00:13:02+5:30
सिन्नर : ग्रामीण भागात गावोगावी भरवण्यात येणाऱ्या आठवडे बाजारांच्या करवसुली लिलावाची प्रक्रिया लॉकडाउनमुळे स्थगित करण्यात आली असल्याने ग्रामपंचायतींना आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागत आहे. गेल्या वर्षी लिलाव घेतलेल्या बोलीधारकांनादेखील आर्थिक फटका सहन करावा लागत आहे.

आठवडे बाजार लिलाव स्थगित झाल्याने नुकसान
सिन्नर : ग्रामीण भागात गावोगावी भरवण्यात येणाऱ्या आठवडे बाजारांच्या करवसुली लिलावाची प्रक्रिया लॉकडाउनमुळे स्थगित करण्यात आली असल्याने ग्रामपंचायतींना आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागत आहे. गेल्या वर्षी लिलाव घेतलेल्या बोलीधारकांनादेखील आर्थिक फटका सहन करावा लागत आहे.
एप्रिल ते मार्च या कालावधीसाठी आठवडे बाजार कर वसुलीसाठी लिलावप्रक्रिया राबवण्यात येते. यात बोली लावून अधिक पुकारा करणाºयास वर्षभरासाठी करवसुलीचा ठेका देण्यात येतो. लिलावातून मिळणारी रक्कम गावाच्या विकासासाठी वापरण्यात येते. यंदा कोरोनामुळे ही लिलावप्रक्रिया मे उलटला तरी राबवणे शक्य नाही. त्यामुळे ग्रामपंचायतींना हक्काच्या उत्पन्नावर पाणी सोडण्याची वेळ आली आहे. त्यात आठवडे बाजार भरत नसल्याने गेल्या वर्षीचा लिलाव घेणाऱ्यांना शेवटच्या तीन चार बाजारांवर पाणी सोडावे लागले आहे. तर नव्याने लिलाव घेणाºयास लॉकडाउन उठल्यानंतरच बाजार करवसुली करता येणार आहे. असे असले तरी पुढील काळात लिलावापोटी भरलेले पैसे वसूल होणार कसे, असा प्रश्न संबंधितांना भेडसावतो आहे. बाजार कर लिलावातून ग्रामपंचायतीस एक लाख ते पाच लाखापर्यंत उत्पन्न मिळते. मोठ्या ग्रामपंचायती अधिक उत्पन्न बाजार करवसुली लिलवातून मिळवतात. तालुक्यातील वावी, ठाणगाव, पांढुर्ली, नायगाव, नांदूरशिंगोटे पाथरे, शहा, पंचाळे, सोमठाणे, वडांगळी या गावांमध्ये आठवड्यातून एक दिवस भरणारा बाजार जिल्हाधिकाºयांच्या आदेशान्वये बंद करण्यात आलेले आहेत. त्यामुळे अनेक ठेकेदाराचे वर्षातील लिलावाफुटीची रक्कम आगाऊ भरल्याने नुकसान झाले आहे. तसेच बाजारामध्ये वस्तू विकणाºया व्यावसायिकांनादेखील आर्थिक फटका बसला आहे.