आयएसआय मार्क, मेकच्या अटीला खो!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2020 04:12 IST2020-12-29T04:12:59+5:302020-12-29T04:12:59+5:30

नाशिक : महापालिकेने आग विझविण्यासाठी फायर बॉल खरेदीची निविदा काढताना अनेक सेायीच्या अटी टाकल्या आहेत. यात अवघ्या दीड हजार ...

Lose ISI Mark, Mack's terms! | आयएसआय मार्क, मेकच्या अटीला खो!

आयएसआय मार्क, मेकच्या अटीला खो!

नाशिक : महापालिकेने आग विझविण्यासाठी फायर बॉल खरेदीची निविदा काढताना अनेक सेायीच्या अटी टाकल्या आहेत. यात अवघ्या दीड हजार रुपयांत मिळणारा फायर बॉल हा ६ हजार ३८८ रुपयांना खरेदी करण्याचा घाट घातला आहेच, परंतु आयएसआय मार्क आणि मेक कोणते हवे, याबाबत निविदेत कोणताही उल्लेख नाही. भारतीय मानक ब्युरो म्हणजेच आयएसआयचे महापालिकेला याच बाबतीत वावडे काय, असा प्रश्नही निर्माण झाला आहे. महापालिकेच्या वतीने आग विझविण्यासाठी फायर बॉल खरेदीची निविदा प्रसिद्ध करण्यात आली आहे. बाजारात आणि ऑनलाइनही जे फायर बॉल अवघे सहाशे ते सातशे रुपये ते दीड हजार या किमतीत आहेत. ते बॉल ६ हजार ३८८ रुपयांना खरेदी करण्याचा घाट घातला जात आहे. महापालिकेची आर्थिक स्थिती बिकट असल्याचे सांगून नागरी कामांच्या फायली रोखण्यात येतात. मात्र, येथे तर लुटालूट सुरू आहे. कंत्राटदार आणि काही पदाधिकारी-नगरसेवक, तसेच अधिकारी अशी साखळी तयार करून पेस्ट कंट्रोल, आउटसोर्सिंग अशा अनेक निविदा काढण्यात आल्या आहेत. त्यात ही निविदाही ठेकेदाराचं चांगभलं करण्याच्या उद्देशाने काढण्यात आल्याचे दिसत आहे.

महापालिकेच्या वतीने सध्या रहिवासी आणि व्यावसायिक इमारतींना फायर ऑडिट आणि त्यानुसार साधने वापरण्याची सक्ती करण्यात आली आहे. रुग्णालयांचा विषय तर खूप गाजला होता. त्यासाठी अग्निशमन दलाकडून आयएसआय मार्क असलेले अग्निशमन सुरक्षा साधने वापरण्याची सक्ती करण्यात आली आहे. मात्र, महापालिकेने फायर बॉल खरेदी करताना त्याची कोणतीही अट घातलेली नाही. त्यामुळे आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. अशाच प्रकारे मेक कोणत्या प्रकारचा हवा याचीही नाेंद नाही. त्यामुळे हलक्या दर्जाचे आणि विशेष करून चिनी उत्पादने महापालिकेच्या गळ्यात मारली जाऊ शकतात. किंबहुना अशा प्रकारच्या सुमार दर्जाच्या फायर बॉल खरेदीसाठीच आयएसआय मार्क आणि मेकच्या अटीचा निविदेत समावेश केलेला नाही, असे दिसते आहे.

...इन्फो...

प्री ऑडिटमध्येही घेाळ

आता कोणत्याही निविदेच्या पूर्वी प्रशासनाने प्री ऑडिट सुरू केले आहे. मग लेखा परीक्षण विभागाच्या ऑडिटमधून या सर्व बाबी कशा काय सुटल्या, असा प्रश्न केला जात आहे. अग्निशमन दलाच्या प्रमुखांनी कोणाच्या सांगण्यावरून निविदा तयार केली आणि त्यातील उणिवांकडे लेखा परीक्षण विभागाने डोळे झाक का केली, असा प्रश्नही उपस्थित आहे.

Web Title: Lose ISI Mark, Mack's terms!