भगवान ऋषभदेव महामस्तकाभिषेक महोत्सव;
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2022 23:07 IST2022-05-18T23:06:19+5:302022-05-18T23:07:41+5:30
चांदवड : मांगीतुंगी येथे भगवान ऋषभदेव १०८ फूट मूर्ती महामस्तकाभिषेक महोत्सव १५ ते ३० जून २०२२ या कालावधीत होणार ...

महामस्तकाभिषेक महोत्सवाचे निमंत्रण राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना देताना रवींद्रकीर्ती स्वामी, संजय पापडीवाल, सी. आर. पाटील, प्रमोद कासलीवाल, अनिल जैन, भूषण कासलीवाल, जीवनप्रकाश जैन, ॲड. रवींद्र पगार, महेंद्र काले, बाळासाहेब कासलीवाल आदी.
ठळक मुद्देराज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना आमंत्रण
चांदवड : मांगीतुंगी येथे भगवान ऋषभदेव १०८ फूट मूर्ती महामस्तकाभिषेक महोत्सव १५ ते ३० जून २०२२ या कालावधीत होणार आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना आयोजन समितीच्या शिष्टमंडळाने महोत्सवाच्या उपस्थितीसाठी आमंत्रण देण्यात आल्याची माहिती संयोजकांनी दिली.
१०८ फूट भगवान ऋषभदेव मूर्ती निर्माण कमिटीचे पीठाधीश रवींद्रकीर्ती स्वामी, महामंत्री संजय पापडीवाल, अधिष्ठाता सी. आर. पाटील, कोषाध्यक्ष प्रमोद कासलीवाल, कार्याध्यक्ष अनिल जैन, महामंत्री भूषण कासलीवाल, जीवनप्रकाश जैन, ॲड. रवींद्र पगार, महेंद्र काले, बाळासाहेब कासलीवाल आदी यावेळी उपस्थित होते.