श्रीकृष्ण म्हणजे सत्यस्वरूप, कर्मावर विजय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 04:29 IST2021-09-02T04:29:53+5:302021-09-02T04:29:53+5:30

मिळवून देणार शक्तीस्थान : महंत चक्रपाणी लोकमत न्यूज नेटवर्क: वेळुंजे (त्र्यंबकेश्वर) : भगवान श्रीकृष्ण हे सत्यस्वरूप आहेत. कर्मावर विजय ...

Lord Krishna means truth, victory over karma | श्रीकृष्ण म्हणजे सत्यस्वरूप, कर्मावर विजय

श्रीकृष्ण म्हणजे सत्यस्वरूप, कर्मावर विजय

मिळवून देणार शक्तीस्थान : महंत चक्रपाणी

लोकमत न्यूज नेटवर्क:

वेळुंजे (त्र्यंबकेश्वर) : भगवान श्रीकृष्ण हे सत्यस्वरूप आहेत. कर्मावर विजय मिळवून देणारे हे शक्तिस्थान आहे. निष्काम कर्म करण्यासाठी कृष्णाने गीता सांगितली, श्रीकृष्ण जन्माची कथा श्रवण करताना आपणही कृष्णजीवनाचे अनेक पैलू समजून घेतले पाहिजे. गीतेने मानवाला देवाने सेवा सत्कर्म व दान धर्माबाबत ज्ञात केले तसे सत्य आचरण मानवाकडून होणे ही खरी देवपूजा आहे, असे निरूपण महंत चक्रपाणी बाबा यांनी श्रीकृष्ण जन्मोत्सव कथेत केले.

गिरणारे येथील एकमुखी दत्तमंदिरात श्रीकृष्ण जन्मोत्सवानिमित्त श्रीकृष्ण जन्मकथेच्या निरुपण झाले. यावेळी सुनील केदार व दिलीप थेटे यांच्या हस्ते सपत्नीक ग्रंथ पूजन झाले. त्यानंतर रात्री ९ वाजता प्रारंभ झालेल्या श्रीकृष्ण जन्मकथेच्या निमित्ताने कृष्ण जन्माच्या कथेतील सर्व घटना यावेळी सांगितल्या,

अहंकारी दुष्ट प्रवृत्तीच्या कंसाचा वध करण्यासाठी श्रीकृष्णाला जन्म घ्यावा लागला, जिथे अन्याय, अत्याचार, अनाचार वाढतो तिथे देवाला जन्म घेऊन तो संपवावा लागतो. मानवाने स्वतःचे वैयक्तिक आयुष्य जगताना आपल्या आयुष्यात सत्कर्म करावे, नाशवंत असलेल्या माया, मोह, संपत्ती देहाच्या अधीन होऊ नये, मनुष्य जन्म सेवेचा मार्ग आहे. त्या जन्माला अध्यात्माची किनार हवी असे त्यांनी सांगितले.

कथेच्या सांगतेवेळी बालश्रीकृष्ण मूर्तीला पाळण्यात बसवून कृष्ण पाळणा म्हणून कृष्णजन्मोत्सव साजरा करण्यात आला. प्रसाद वाटप करून कार्यक्रमाची सांगता झाली. यावेळी विशाल महाराज, नारायण उगले, दत्तू थेटे, हरी थेटे, प्रकाश भागवत, गोरख पांगरे, विलास थेटे आदी उपस्थित होते.

310821\img-20210831-wa0019.jpg

फोटो:-

Web Title: Lord Krishna means truth, victory over karma