महिलेस भुरळ पाडून दागिन्यांची लूट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2018 00:36 IST2018-05-13T00:36:24+5:302018-05-13T00:36:24+5:30

मुलाचा मित्र असल्याचे खोटे सांगून अर्ज भरण्याच्या बहाण्याने तहसील कार्यालयाबाहेर नेऊन महिलेस भुरळ पाडून तिच्या अंगावरील पन्नास हजार रुपये किमतीचे दागिने काढून नेल्याची घटना शुक्रवारी (दि़११) दुपारच्या सुमारास घडली़

 Looted jewelery | महिलेस भुरळ पाडून दागिन्यांची लूट

महिलेस भुरळ पाडून दागिन्यांची लूट

नाशिक : मुलाचा मित्र असल्याचे खोटे सांगून अर्ज भरण्याच्या बहाण्याने तहसील कार्यालयाबाहेर नेऊन महिलेस भुरळ पाडून तिच्या अंगावरील पन्नास हजार रुपये किमतीचे दागिने काढून नेल्याची घटना शुक्रवारी (दि़११) दुपारच्या सुमारास घडली़  सरकारवाडा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार जैबुनिसा शमशुद्दीन पठाण (रा़ गुरुज्योत अपार्टमेंट, नाशिकरोड) या जुने सीबीएसजवळील तहसील कार्यालयात कामानिमित्त आल्या होत्या़ दुपारी दोन वाजेच्या सुमारास समीर हाजी नावाचा इसम त्यांच्याकडे आला व मी तुमचा मुलगा तन्वीर याचा मित्र असल्याची खोटी माहिती सांगून त्यांना बोलण्यात गुंतविले़ यानंतर अर्ज भरून देण्याच्या बहाण्याने तहसील कार्यालयाच्या बाहेर बोलावून नेत भुरळ पाडून त्यांच्या अंगावरील १५ ग्रॅमची सोन्याची चेन, ५ ग्रॅमचे मंगळसूत्र अशा ४५ हजार रुपये किमतीच्या दागिन्यांची फसवणूक केली़

Web Title:  Looted jewelery

टॅग्स :Crimeगुन्हा