रस्त्यात अडवून सिलिंडर गाडी चालकाची लूट
By Admin | Updated: May 15, 2014 00:11 IST2014-05-14T23:21:54+5:302014-05-15T00:11:16+5:30
सिडको : गॅस सिलिंडर वितरित करणार्या चालकाला अडवून मारहाण करीत त्याच्या जवळील सुमारे १३ हजार रुपयांची लूट करण्यात आल्याची घटना खुटवडनगर भागात घडली. याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रस्त्यात अडवून सिलिंडर गाडी चालकाची लूट
सिडको : गॅस सिलिंडर वितरित करणार्या चालकाला अडवून मारहाण करीत त्याच्या जवळील सुमारे १३ हजार रुपयांची लूट करण्यात आल्याची घटना खुटवडनगर भागात घडली. याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गेल्या बुधवारी दीड वाजेच्या सुमारास वैशंपायन गॅस एजन्सीचे कर्मचारी राकेश पाटील रा. पवननगर हे टॅम्पो (क्रमांक एमएच१५/बीएन/३७६९) घेऊन गॅस सिलिंडर वितरित करीत असताना दुपारच्या सुमारास दोन दुकींवरील चार व्यक्तींनी त्यांची गाडी अडविली. चालक पाटील यांना दमबाजी व धक्काबुक्की करीत त्यांच्याकडे असलेली सुमारे १३ हजार रुपयांची रोकड, भ्रमणध्वनी हिसकावून त्यांनी पळ काढला. याप्रकरणी अंबड पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, खुटवडनगर भागात गुन्हेगारीने डोके वर काढले असून, त्यांचा त्वरित बंदोबस्त करावा, तसेच पाटील यांना न्याय मिळावा यासाठी सिडकोतील राजकीय पदाधिकार्यांनी पोलीस उपआयुक्त डॉ. डी. एस. स्वामी यांची भेट घेतली. यात सिडको भाजपा मंडल अध्यक्ष जगन पाटील, कॉँग्रेस गटनेता लक्ष्मण जायभावे, भाजपा उद्योग आघाडीचे प्रदीप पेशकार, माजी नगरसेवक बाळासाहेब पाटील, नाना भामरे, दीपक मटाले, विजय पाटील, सुरेश पाटील, प्रकाश अमृतकर आदि उपस्थित होते.(वार्ताहर)