स्वतःला आध्यात्मिक गुरु म्हणवून घेणाऱ्या नाशिकच्याअशोक खरात ऊर्फ भोंदू बाबाच्या पापाचा घडा आता भरला आहे. दररोज या बाबाच्या काळ्या कारनाम्यांचे नवे पदर समोर येत असून, अंधश्रद्धेचा बाजार मांडून त्याने एका भक्ताला चक्क २१ देशांची वारी घडवून आणली आणि त्याच्याच पैशावर आपली चैन भागवल्याचे उघड झाले आहे. विशेष तपास पथकाकडून सुरू असलेल्या चौकशीत आता अशा काही गोष्टी समोर आल्या आहेत, ज्या ऐकून सगळ्यांच डोकं चक्रावून गेलंय.
२१ देशांची माती अन् होईल प्रगती..
एका तक्रारदाराने दिलेल्या माहितीनुसार, खरातने त्याला आयुष्यात प्रगती करायची असेल तर '२१ देशांची माती' हाताला लागणे आवश्यक असल्याचे सांगितले. या अंधश्रद्धेच्या जाळ्यात अडकवून त्याने २०१८ ते २०२५ या काळात पीडित व्यक्तीला अनेक देशांच्या वाऱ्या करायला लावल्या. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, या सर्व परदेश दौऱ्यांमध्ये अशोक खरात हा स्वतः देखील पीडित व्यक्तीसोबत गेला होता आणि तिथल्या राहण्या-खाण्याचा, फिरण्याचा लाखो रुपयांचा खर्च या भोंदू बाबाने पीडित व्यक्तीकडूनच वसूल केला.
साप दाखवून घातली भीती!
अशोक खरात हा केवळ आर्थिक लूट करून थांबला नाही, तर त्याने पीडितावर मानसिक दहशतीचा वापर केला. ईशानेश्वर मंदिरात 'उत्तर पूजा' करण्याच्या नावाखाली त्याने पीडिताला बोलावले. तिथे अचानक एक मोठा साप दाखवून "ईशानेश्वर महाराज प्रसन्न झाले आहेत" असे भासवले. सापाच्या भीतीपोटी आणि तथाकथित दैवी कोपाच्या धास्तीने पीडित व्यक्ती पूर्णपणे खचून गेली आणि खरातच्या जाळ्यात अधिकच अडकत गेली.
मर्सिडीज आणि फार्महाऊसवर भक्ताच्या पैशाने डल्ला
या भोंदू बाबाचा हव्यास एवढा होता की, त्याने पीडिताला धमकावून स्वतःसाठी महागडी मर्सिडीज कार विकत घेण्यास भाग पाडले. इतकेच नाही, तर आपल्या फार्महाऊसचा देखभालीचा खर्च आणि परदेशातील उपचारांच्या नावाखाली लाखो रुपये उकळले. जर पैसे दिले नाहीत, तर तुझ्या कुटुंबाला संपवून टाकीन, अशी धमकीही तो वारंवार देत होता.
एसआयटीचा फास आवळला!
या हायप्रोफाईल प्रकरणाचे गांभीर्य ओळखून नाशिकच्या एसआयटी प्रमुख तेजस्विनी सातपुते स्वतः या प्रकरणावर लक्ष ठेवून आहेत. नाशिक जिल्हा न्यायालयाने अशोक खरातला ५ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. आता केवळ लैंगिक शोषणच नाही, तर आर्थिक गैरव्यवहार, परकीय चलन आणि भोंदूगिरी अशा सर्वच कोनातून तपास चक्रं फिरू लागली आहेत.
Web Summary : Ashok Kharat, a fake guru, allegedly swindled a devotee by promising progress through soil from 21 countries. He extorted money for foreign trips, threatened the victim, and acquired luxury items. Police investigation continues, uncovering financial fraud and exploitation.
Web Summary : अशोक खरात नामक एक ढोंगी गुरु ने 21 देशों की मिट्टी से प्रगति का वादा करके एक भक्त को ठगा। उसने विदेश यात्राओं के लिए पैसे वसूले, पीड़ित को धमकाया और लग्जरी सामान हासिल किया। पुलिस जांच जारी है, जिसमें वित्तीय धोखाधड़ी और शोषण का खुलासा हो रहा है।