गॅस कटरने शटर कापून पाच लाखांची लूट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:38 IST2021-02-05T05:38:04+5:302021-02-05T05:38:04+5:30
प्रगती मार्केटमध्ये प्रितेश विजय कुमार कोठारी यांचे मागील दोन वर्षांपासून मोबाइल शॉपीचे दुकान आहे. नेहमीप्रमाणे मंगळवारी (दि.२) ...

गॅस कटरने शटर कापून पाच लाखांची लूट
प्रगती मार्केटमध्ये प्रितेश विजय कुमार कोठारी यांचे मागील दोन वर्षांपासून मोबाइल शॉपीचे दुकान आहे. नेहमीप्रमाणे मंगळवारी (दि.२) रात्री साडेनऊ वाजता ते दुकान बंद करून घरी गेले. बुधवारी सकाळी नेहमीप्रमाणे पावणे आठ वाजताच्या सुमारास त्यांना येथील कामगार गोपाल प्रजापती यांनी संपर्क करत दुकानाचे शटर कापून चोरी झाल्याचे दिसत असल्याचे सांगितले. माहिती मिळताच प्रीतेश हे दुकानाजवळ पोहोचले. दुकानाचे शटर कापलेले आणि काचेचा दरवाजा तोडलेला त्यांना आढळून आला. त्यांनी तातडीने याबाबत पोलिसांना माहिती दिली. तातडीने घटनास्थळी पोलीस उपआयुक्त विजय खरात, सहायक आयुक्त अशोक नखाते, वरिष्ठ पोलीस निरीक्षक नीलेश माईनकर यांनी धाव घेत पाहणी केली केली.
चोरट्यांनी ३५ मोबाइल, २० ब्लूटूथ स्पीकर, ६० पॉवर बँक, १७ एअर पॅड, लॅपटॉप व सॉफ्टवेअर असा एकूण सुमारे ५ लाख २ हजार रुपयांचा ऐवज चोरट्यांनी गायब केल्याची फिर्याद कोठारी यांनी इंदिरा नगर पोलीस ठाण्यात दिली आहे. यानुसार पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध घरफोडीचा गुन्हा दाखल केला आहे.
----
---इन्फो--
‘चादर गँग’चे कृत्य सीसी टीव्हीत कैद
पहाटे साडेचार वाजताच्या सुमारास चारचाकीमधून आलेल्या चोरट्यांनी या दुकानाभोवती चादरीचा आडोसा धरत गॅस कटरद्वारे शटर कापून दुकानात प्रवेश करत मिळेल त्या वस्तू बॅगेत भरुन पोबारा केल्याची घटना या दुकानाशेजारी असलेल्या दुसऱ्या दुकानाच्या सीसी कॅमेऱ्यात कैद झाली आहे. चोरट्यांनी प्रीतेश यांचे दुकान फोडल्यानंतर या दुकानातील सीसी कॅमेरे आणि डीव्हीआरसुद्धा सोबत नेला आहे. जेणेकरून पोलिसांना माग काढता येणार नाही; मात्र शेजारील दुकानाच्या कॅमेऱ्यांनी त्यांचा हा प्रताप टिपल्याने पोलीस त्या आधारे तपास करत आहेत. दोन पथके तयार करून चोरट्यांच्या मागावर धाडण्यात आली आहेत.
--इन्फो--
दोन वर्षांपूर्वी अशाच पद्धतीने फोडले होते शोरुम
दोन वर्षांपूर्वी अशाच पद्धतीने चोरट्यांनी गंगापूर रोडवरील आयफोन विक्रीचे ॲपल कंपनीचे शोरुम फोडून महागडे आयफोनसह कोट्यवधींचा ऐवज लुटला होता. या गुन्ह्याचा तपास करताना गुन्हे शाखा युनिट-१च्या पथकाने आंतरराज्यीय टोळीच्या काही चोरट्यांना ताब्यात घेतले होते. यानंतर पुन्हा चादर गँग शहरात सक्रिय झाली की काय? अशी भीती व्यक्त केली जात आहे.
----
--
फोटो आर वर ०३इंदिरानगर नावाने सेव्ह आहे.