लोकशाहीर अण्णा भाऊ साठे जयंती व लोकमान्य टिळक पुण्यतिथी साजरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2018 16:46 IST2018-08-04T16:44:39+5:302018-08-04T16:46:22+5:30

देवळाली कॅम्प : परिसरात विविध शाळा, महाविद्यालय, संस्था आदींच्या वतीने लोकशाहीर अण्णा भाऊ साठे जयंती व लोकमान्य टिळक पुण्यतिथी साजरी करण्यात आली.

Lokshahir Annabhau Sathe Jayanti and Lokmanya Tilak Punyitithi celebrated | लोकशाहीर अण्णा भाऊ साठे जयंती व लोकमान्य टिळक पुण्यतिथी साजरी

लोकशाहीर अण्णा भाऊ साठे जयंती व लोकमान्य टिळक पुण्यतिथी साजरी

ठळक मुद्देनाशिकरोड, देवळाली कॅम्प परिसरात विविध कार्यक्रम

देवळाली कॅम्प : परिसरात विविध शाळा, महाविद्यालय, संस्था आदींच्या वतीने लोकशाहीर अण्णा भाऊ साठे जयंती व लोकमान्य टिळक पुण्यतिथी साजरी करण्यात आली.
कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या उपाध्यक्ष मीना करंजकर यांनी मनोगत व्यक्त केले. साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे सामाजिक सेवा संस्थेच्या वतीने लोकशाहीर अण्णा भाऊ साठे जयंतीदिनी अंध-अपंगांसाठी मोफत रिक्षा प्रवास शुभारंभाप्रसंगी करंजकर बोलत होत्या. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून नगरसेवक भगवान कटारिया, माजी उपाध्यक्ष तानाजी करंजकर, नगरसेविका प्रभावती धिवरे, आशा गोडसे, भीमराव धिवरे, अरुण जाधव, जगदीश गोडसे, चंद्रकांत गोडसे, विलास धुर्जड आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन सुभाष बोराडे व आभार अनिल बोराडे यांनी मानले. यावेळी छाया बोराडे आदी उपस्थित होते.

Web Title: Lokshahir Annabhau Sathe Jayanti and Lokmanya Tilak Punyitithi celebrated

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.