शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात पाचव्या टप्प्यातील १३ लोकसभा मतदारसंघात अंदाजे ५४.३३ टक्के मतदान  
2
भगवान जगन्नाथ मोदींचे भक्त; संबित पात्रांच्या वक्तव्याने नवा वाद, विरोधकांनी BJP ला घेरले...
3
इराणमधील सत्तासंघर्षामधून इब्राहीम रईसींचा बळी? खोमेनींच्या मुलावर संशय, इराणमध्ये चर्चांना उधाण
4
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
5
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
6
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
7
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
8
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
9
सॅमसंगची मोठी घोषणा! तुम्ही तुमचा फुटलेला किंवा खराब झालेला फोन वर्षातून दोनदा दुरुस्त करू शकता
10
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
11
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
12
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
13
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
14
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
15
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
16
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
17
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
18
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
19
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
20
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट

उमेदवारीबाबत छगन भुजबळांना कोणी शब्द दिला?; मंत्री गिरीश महाजनही अनभिज्ञ

By संकेत शुक्ला | Published: March 31, 2024 7:50 PM

पार्लमेंटरी बोर्डात ठरेल तेच अंतिम, भुजबळांच्या विधानावर महाजनांचं उत्तर

नाशिक - Girish Mahajan on Chhagan Bhujbal ( Marathi News ) महायुतीतील तीनही पक्षांना नाशिकची जागा हवी आहे. तसे वागणे स्वाभाविक आहे. शिंदे सेनेकडे सध्या जागा आहे, राष्ट्रवादीलाही जागा हवी आहे आणि नाशिक हा भाजपचा बालेकिल्ला असल्याने आम्हालाही ही जागा हवी आहे. मात्र, त्याबाबत पार्लमेंटरी बोर्डात जो निर्णय होईल तो अंतिम असेल, भुजबळ यांना कोणी शब्द दिला असेल तर त्याबाबत मला माहिती नाही, प्रसंगी हक्क सांगणाऱ्यांनाही आपला हक्क सोडावा लागेल, असे सूचक वक्तव्य नेते आ. गिरीश महाजन यांनी केले.

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रविवारी (दि.३१) भाजप कार्यालयात कार्यकर्त्यांच्या बैठकीसाठी आल्यानंतर ते बोलत होते. यावेळी प्रदेश प्रवक्ते लक्ष्मण सावजी यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. नाशिकमध्ये भाजपचे संख्याबळ जास्त आहे. तीन आमदार, ७० नगरसेवक आणि इतर बलाबल पाहता नाशिक आमचा बालेकिल्ला असल्याचे स्पष्ट होते. नाशिकबाबत अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची त्यासाठी चर्चा सुरू आहे. पार्लमेंटरी बोर्डही त्यात मार्गदर्शन करणार आहे. त्यानंतरच जागेचा वाद सुटू शकेल. अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांनी केलेल्या दाव्याबाबत मला माहिती नाही. पार्लमेंटरी बोर्डात काय चर्चा झाली त्यांना कोणी सांगितलं? एक-दोन दिवसांत अंतिम यादी येईल. त्यानंतरच नाव जाहीर होईल, असेही महाजन म्हणाले.

जनताच ठाकरे यांना पिक्चर दाखवेलउद्धव ठाकरे यांनी केलेल्या वक्तव्याचा समाचार घेताना ते म्हणाले की, उद्धव यांनी आता त्यांच्या पक्षाचा विचार करावा. कोणाला कोणता पिक्चर दाखवायचा ते नंतर बघा, निवडणुकीत जनता तुम्हालाच पिक्चर दाखवण्याच्या तयारीत आहे. महाराष्ट्रात फिरा म्हणजे समजेल असे ते म्हणाले. ठाकरे सेनेतील आमदार आमच्याकडे आले तेव्हा ते भ्रष्ट होते का? असे आरोप बालिश असल्याची टीकाही महाजन यांनी केली. सुप्रिया सुळे यांच्या वक्तव्याचाही त्यांनी समाचार घेतला.

टॅग्स :Chhagan Bhujbalछगन भुजबळGirish Mahajanगिरीश महाजनnashik-pcनाशिकlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४