लोकनेते, जिजामाता विद्यालयात थँक्स अ टीचर अभियान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2020 18:02 IST2020-09-05T18:02:04+5:302020-09-05T18:02:32+5:30

लासलगाव : लोकनेते दत्ताजी पाटील विद्यालय व जिजामाता कन्या विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने शिक्षकांप्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी ‘थँक्स अ टीचर’अभियान पार पडले. निबंध, वक्तृत्व, कविता, घोषवाक्य, प्रेरणा व प्रबोधनात्मक गीत, वाचन करून शिक्षकांबद्दल असणारा आदर विद्यार्थ्यांनी व्यक्त केला. शिक्षक दिनाच्या या दिवशी कोविड योद्धा असणाऱ्या शिक्षकांचा सन्मान करण्यात आला.

Loknete, Thanks a Teacher Campaign at Jijamata Vidyalaya | लोकनेते, जिजामाता विद्यालयात थँक्स अ टीचर अभियान

लोकनेते, जिजामाता विद्यालयात थँक्स अ टीचर अभियान

ठळक मुद्दे‘थँक्स अ टीचर’अभियान

लासलगाव : लोकनेते दत्ताजी पाटील विद्यालय व जिजामाता कन्या विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने शिक्षकांप्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी ‘थँक्स अ टीचर’अभियान पार पडले. निबंध, वक्तृत्व, कविता, घोषवाक्य, प्रेरणा व प्रबोधनात्मक गीत, वाचन करून शिक्षकांबद्दल असणारा आदर विद्यार्थ्यांनी व्यक्त केला. शिक्षक दिनाच्या या दिवशी कोविड योद्धा असणाऱ्या शिक्षकांचा सन्मान करण्यात आला. याप्रसंगी प्राचार्य विश्वास पाटील, शालेय समितीचे सदस्य कैलास ठोंबरे, जयश्री बोराडे, डॉ. अनिल बोराडे यांच्या हस्ते डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष नानासाहेब पाटील, सचिव संजय पाटील, उपाध्यक्ष निवृत्ती गायकर, संचालिका नीता पाटील, संस्थेच्या कार्यकारी अधिकारी वैष्णवी पाटील, मुख्याध्यापक संजीवनी पाटील, पर्यवेक्षक दत्तूू गांगुर्डे, सुधाकर सोनवणे आदी उपस्थित होते.
 

Web Title: Loknete, Thanks a Teacher Campaign at Jijamata Vidyalaya

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.