शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

लोकमत इम्पॅक्ट: निवृत्तिनाथांना प्रवासभाड्याचा ‘रिटर्न चेक’; एसटी महामंडळाला सुबुद्धी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 2, 2020 07:04 IST

परिवहनमंत्री अनिल परब यांनी या साऱ्या प्रकाराबाबत खेद व्यक्त केला असून, संबंधितांवर कारवाईचे आदेश दिले आहेत. नाशिक आगाराने संस्थानकडून ७१ हजार रुपयांचे भाडे घेतल्यानंतर बस उपलब्ध करून दिली.

नाशिक : आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरला विठूमाउलीच्या भेटीसाठी त्र्यंबकेश्वर येथील संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांची पालखी घेऊन गेलेल्या संस्थानकडून शिवशाही बसचे प्रवासभाडे आकारणी राज्य परिवहन महामंडळाच्या नाशिक आगाराला महागात पडली आहे. लोकमतमध्ये वृत्त प्रसिद्ध होताच वारकरी सांप्रदायातून रोष व्यक्त होऊ लागल्यानंतर आगाराने संस्थानला प्रवासभाड्याचा धनादेश परत केला.

परिवहनमंत्री अनिल परब यांनी या साऱ्या प्रकाराबाबत खेद व्यक्त केला असून, संबंधितांवर कारवाईचे आदेश दिले आहेत. नाशिक आगाराने संस्थानकडून ७१ हजार रुपयांचे भाडे घेतल्यानंतर बस उपलब्ध करून दिली.

सोशल माध्यमातूनही महामंडळावर प्रचंड रोष व्यक्त झाला. या साºया प्रकाराची दखल अनिल परब यांनी घेतली. तातडीने सदर प्रवासभाड्याची रक्कम संस्थानला परत करण्याचे आदेश काढले. त्यानुसार, मुंबईतील राज्य परिवहन महामंडळाच्या मध्यवर्ती कार्यालयाकडून नाशिक आगाराला आदेश मिळाले आणि विभाग नियंत्रक नितीन मैंद यांनी तातडीने त्र्यंबकेश्वर गाठत संस्थानला प्रवासभाड्याचा रिटर्न चेक देऊन दिलगिरी व्यक्त केली. संस्थानने दिलेला धनादेश वटला गेल्यामुळे महामंडळाला स्वत:चा धनादेश तयार करून द्यावा लागला. पुजारी जयंत महाराज गोसावी यांनी सदर धनादेश स्वीकारत महामंडळाला आभारपत्र दिले.संतांच्या पालख्या शिवशाही बसने मोफत घेऊन जाण्याच्या स्पष्ट सूचना दिलेल्या असतानाही नाशिक आगाराने भाडे वसूल करणे चुकीचे होते. दोषींवर कारवाई करण्यात येईल. - अनिल परब, परिवहनमंत्रीशासनाकडे आम्ही बस मोफत मिळण्यासाठी विनंतीपत्रे दिली होती. परंतु, जिल्हा प्रशासनाकडून तसा आदेश नसल्याचे सांगितल्याने संस्थानने प्रवासभाडे भरले होते. महामंडळाने पैसे परत दिले. माउलीनेच त्यांना सुबुद्धी दिली. - पवनकुमार भुतडा, अध्यक्ष, निवृत्तिनाथ संस्थान, त्र्यंबकेश्वर

टॅग्स :Lokmatलोकमतstate transportएसटीAnil Parabअनिल परब