लोहोणेरला शेतमजुराची गळफास घेऊन आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2021 00:10 IST2021-02-14T21:52:34+5:302021-02-15T00:10:45+5:30
लोहोणेर : परिसरातील शेमळी येथील शेतमजुराने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. रविवारी (दि.१४) रोजी सकाळी सदर प्रकार उघडकीस आला.

लोहोणेरला शेतमजुराची गळफास घेऊन आत्महत्या
लोहोणेर : परिसरातील शेमळी येथील शेतमजुराने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. रविवारी (दि.१४) रोजी सकाळी सदर प्रकार उघडकीस आला. दरम्यान, आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नसून घरगुती वादामुळे ही आत्महत्या केली असावी असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.
याबाबत देवळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लोहोणेर येथील प्रगतशील शेतकरी राजेंद्र गुळेचा यांच्या शेतात काम करीत असलेला शेतमजूर कैलास डोंगर सोनवणे (४५,मूळ रा. शेमळी) याने गुळेचा यांच्या शेतातील (गट क्र. ५३६)मधील निंबाच्या झाडाला दोरी बांधून गळफास घेऊन आत्महत्या केली. सकाळी सदर प्रकार उघडकीस आला.
लोहोणेर येथील पोलीस पाटील अरुण उशिरे यांनी देवळा पोलीस ठाण्यात दूरध्वनीवरून वरील माहिती दिली. देवळा पोलीस ठाण्याचे कर्मचारी प्रकाश सोनवणे यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. देवळा येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन केल्यानंतर सदर मृत्यदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला. मृत शेतमजूर कैलास सोनवणे यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, सून व तीन मुली असा परिवार आहे. याबाबत देवळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस निरीक्षक सुहास देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली प्रकाश सोनवणे हे पुढील तपास करीत आहेत.