सलग तिसऱ्या दिवशी निफाडला लॉकडाउन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2020 23:24 IST2020-04-01T23:24:23+5:302020-04-01T23:24:51+5:30
कोरोनाचा संशयित रुग्ण जिल्हा रुग्णालयात दाखल झाल्याच्या पार्श्वभूमीवर निफाड शहरात लॉकडाउन पाळण्यात आला, तसेच परिसरातील गावामध्ये सतर्कता बाळगण्यात येत असून, सर्वत्र शुकशुकाट आहे.

निफाड शहरात औषध फवारणी करताना नगरपंचायत कर्मचारी.
निफाड : तालुक्यातून कोरोनाचा संशयित रुग्ण जिल्हा रुग्णालयात दाखल झाल्याच्या पार्श्वभूमीवर निफाड शहरात मंगळवारी लॉकडाउन पाळण्यात आला, तसेच परिसरातील गावामध्ये सतर्कता बाळगण्यात येत असून, सर्वत्र शुकशुकाट आहे.
शहरातील दवाखाने व मेडिकल वगळता सर्व दुकाने कडकडीतपणे बंद आहेत. सकाळी १० वाजेपर्यंत दूध
विक्र ीला परवानगी देण्यात आलेली होती. डेली भाजीपाला बाजार बंद असल्याने बाजारातही शुकशुकाट होता. नागरिकांची अडचण होऊ नये यासाठी माफक दरात थेट घरपोच भाजीपाला देण्याचा उपक्रम काही सामाजिक संस्थातर्फे सुरू करण्यात आला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी निफाड नगरपंचायतीच्या वतीने ब्लोअर ट्रॅक्टरने औषध फवारणी करण्यात आली. मंगळवारी खेड्या-पाड्यातही नागरिक घराबाहेर निघणे टाळून काळजी घेत होते. जे नागरिक महत्त्वाच्या कामासाठी बाहेर पडले त्या सर्वांनी मास्कचा वापर केला होता. जळगाव फाटा येथे कादवा नदीकिनारी असलेल्या वस्तीत राहणाºया नागरिकांनी सीमेंटचे पाइप लावून रस्ता बंद केला होता. नांदूरमधमेश्वर, नैताळे, धारणगाव वीर येथे कडकडीत लॉकडाउन पाळण्यात आला. निफाड पोलिसांनी पिंपळस रामाचे, उगाव, नैतीळे येथेही पोलीस बंदोबस्त ठेवला होता.
निफाड पोलिसांनी शांतीनगर त्रिफुली येथे बॅरिकेड्स लावून चोख बंदोबस्त ठेवला होता. सोमवारी
(दि.३०) पोलिसांनी रस्त्यावर विनाकारण फिरणाºया ४ जणांवर गुन्हा दाखल केला, तर चार वाहनचालकांवर कारवाई केली व १००० रु . दंड वसूल केला. पिंपळस रामाचे, उगाव, नैताळे येथेही पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.