शाळेला ठोकले कुलूप

By Admin | Updated: August 24, 2014 00:44 IST2014-08-23T22:39:20+5:302014-08-24T00:44:09+5:30

पिंपरखेड ग्रामस्थांनी शाळेला ठोकले कुलूप

Lock locks in the school | शाळेला ठोकले कुलूप

शाळेला ठोकले कुलूप


पिंपरखेड : येथील प्राथमिक शाळेत शिक्षक नसल्यामुळे ग्रामस्थांनी शाळेला कुलूप ठोकले. येथील प्राथमिक शाळेत गेल्या दोन वर्षांपासून मुख्याध्यापक व शिक्षकांची मागणी असून, याकडे संबंधित अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होत आहे. प्राथमिक शाळेत एकूण ४ वर्ग असून, विद्यार्थी पटसंख्या २१५ आहे. शाळेत इयत्ता पहिलीसाठी शिक्षक नसून मुख्याध्यापक पदही रिक्त आहे. याबाबत शिक्षण विस्तार अधिकारी दिलीप नाईकवाडे यांची ग्रामस्थांनी भेट घेतली. परंतु अद्याप कार्यवाही झाली नसल्याने अखेर ग्रामस्थांनी शाळेला कुलूप ठोकले. शिक्षकांची नियुक्ती झाल्याशिवाय कुलूप काढणार नाही, असा इशारा संदीप देशमुख, विनोद चव्हाण, योगेश चव्हाण, नितीन चव्हाण आदिंनी दिला आहे.

Web Title: Lock locks in the school