शहरं
Join us  
Trending Stories
1
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
2
राहुल आणि सिद्धरामय्या यांचा कार्टून व्हिडिओ; काँग्रेसची जेपी नड्डांसह तीन BJP नेत्यांविरुद्ध तक्रार
3
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
4
'राणेंचा प्रचार करायला लागतोय यातच राज ठाकरेंचा विजय'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
5
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
6
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
7
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
8
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
9
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
10
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
11
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
12
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
13
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
14
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
15
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
16
अभिनेते क्षितीज झारापकर यांचे निधन, ५४व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
17
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
18
करिअरच्या उच्च शिखरावर असताना सोडलं बॉलिवूड; लारा दत्ता म्हणाली, 'वाढत्या वयासोबत...'
19
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
20
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!

एचएएल प्रवेशद्वाराजवळ ३५०० कामगारांचा ठिय्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 15, 2019 1:53 AM

प्रलंबित वेतन करारासह इतर मागण्यांसाठी एचएएल कर्मचाऱ्यांच्या देशव्यापी बेमुदत संपास सोमवारपासून (दि. १४) सुरुवात झाली. या अंतर्गत येथील सुमारे ३५०० कामगारांनी सकाळपासून एचएएलच्या प्रवेशद्वारावर ठिय्या देत व्यवस्थापनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.

ठळक मुद्देओझर : प्रलंबित वेतन करारासह विविध मागण्या

ओझर : प्रलंबित वेतन करारासह इतर मागण्यांसाठी एचएएल कर्मचाऱ्यांच्या देशव्यापी बेमुदत संपास सोमवारपासून (दि. १४) सुरुवात झाली. या अंतर्गत येथील सुमारे ३५०० कामगारांनी सकाळपासून एचएएलच्या प्रवेशद्वारावर ठिय्या देत व्यवस्थापनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.प्रलंबित वेतन कराराची बोलणी लवकरात लवकर पूर्ण करावी, अधिकारी वर्गाला दिल्याप्रमाणे कामगारवर्गाला रास्त वेतनवाढ द्यावी ही प्रमुख मागणी आहे. या मागणीसाठी आॅल इंडिया एचएएल को-आॅर्डिनेशन कमिटीच्या माध्यमातून आंदोलन करण्यात येत आहे.व्यवस्थापनाने कामगारांची केवळ निराशा केली असून अधिकारी वर्गाला ३५ टक्के वाढ दिलेली असतांना कामगार वर्गाला तुटपुंजी ८ टक्के वाढ देऊ केल्यामुळे कामगार संपावर गेले आहेत. मागण्या मान्य होईपर्यंत संप कायम राहणार असल्याचे आंदोलनकर्त्यांनी स्पष्ट केले आहे. आंदोलनात भानुदास शेळके, सचिन ढोमसे, प्रविण तिदमे, दिपक कदम, जितु जाधव, अनिल मंडलिक, संजय कुटे, पवन आहेर, अशोक गावंडे, मनोज भामरे, आनंद बोरसे, योगेश ठुबे, संतोष पोकळे, सचिन दीक्षित, मिलिंद निकम, अशोक कदम, सुनिल थोरात, रमेश कदम, सुनील जुमळे, सागर कदम, नवनाथ मुसळे, स्वप्निल तिजोरे, चेतन घुले, संतोष आहेर, मन्सूर शेख, प्रमिला पवार, संदीप कुटे, मंगेश थेटे, राजेंद्र मोरे, नितीन पगारे, राजशेखर जाधव, सचिन धोंडगे, योगेश अहिरे, अनिल गवळी, नितीन पाटील, नितीन कदम, नंदकुमार चव्हाण, अभयसिंग चौधरी, सुशिल सातपुते, शिवाजी पोटे, हेमंत अहिरराव, चिंतामण थिटे, विकास खडताळे आदी सहभागी झाले आहे.व्यवस्थापन कामगारांची पिळवणूक करत असल्याचा आरोप यावेळी कामगारांनी केला. व्यवस्थापनाशी अंतिम बोलणी फिसकटल्याने बेमुदत संप पुकारल्याचे कामगारांचे म्हणणे आहे. गेले ३४ महिने अधिकारीवर्ग पगारवाढीचा लाभ घेत असून, फक्त कामगारांना त्यांच्या हक्कापासून दूर ठेवण्याचे काम व्यवस्थापन करत असल्याचा आरोप कर्मचाऱ्यांनी केला आहे.२० हजार कामगार संपावरलष्कराला लागणाºया विमानांचे उत्पादन करणाºया हिंदुस्थान एअरोनॉटिक्स लिमिटेड (एचएएल) च्या देशभरातील ९ कारखान्यांमध्ये काम करणारे १९ हजार कामगार सोमवारपासून बेमुदत संपावर गेले आहेत. पगारवाढीसह अनेक मागण्यांसाठी त्यांनी संप सुरू केला आहे.एचएएल ही सरकारी कंपनी असून, ती प्रामुख्याने लष्कराला लागणारी विमाने तयार करते. अधिकारी व कामगार यांच्यात विविध भत्त्यांबाबत असलेला भेदभाव दूर करण्यात यावा आणि सर्वांना समान दराने भत्ते मिळायला हवेत, अशीही आमची मागणी असल्याचे कामगार संघटनेचे सरचिटणीस एस. चंद्रशेखर यांनी सांगितले. ते म्हणाले की, वाटाघाटीतून तोडगा निघावा, अशीच आमची इच्छा होती.

टॅग्स :NashikनाशिकStrikeसंप