एचएएल प्रवेशद्वाराजवळ ३५०० कामगारांचा ठिय्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 15, 2019 01:53 AM2019-10-15T01:53:07+5:302019-10-15T01:53:26+5:30

प्रलंबित वेतन करारासह इतर मागण्यांसाठी एचएएल कर्मचाऱ्यांच्या देशव्यापी बेमुदत संपास सोमवारपासून (दि. १४) सुरुवात झाली. या अंतर्गत येथील सुमारे ३५०० कामगारांनी सकाळपासून एचएएलच्या प्रवेशद्वारावर ठिय्या देत व्यवस्थापनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.

Locations of 5 workers at the HAL entrance | एचएएल प्रवेशद्वाराजवळ ३५०० कामगारांचा ठिय्या

ओझर टाऊनशिप येथे प्रवेश द्वारासमोर निदर्शने करताना एचएएल कामगार.

Next
ठळक मुद्देओझर : प्रलंबित वेतन करारासह विविध मागण्या

ओझर : प्रलंबित वेतन करारासह इतर मागण्यांसाठी एचएएल कर्मचाऱ्यांच्या देशव्यापी बेमुदत संपास सोमवारपासून (दि. १४) सुरुवात झाली. या अंतर्गत येथील सुमारे ३५०० कामगारांनी सकाळपासून एचएएलच्या प्रवेशद्वारावर ठिय्या देत व्यवस्थापनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.
प्रलंबित वेतन कराराची बोलणी लवकरात लवकर पूर्ण करावी, अधिकारी वर्गाला दिल्याप्रमाणे कामगारवर्गाला रास्त वेतनवाढ द्यावी ही प्रमुख मागणी आहे. या मागणीसाठी आॅल इंडिया एचएएल को-आॅर्डिनेशन कमिटीच्या माध्यमातून आंदोलन करण्यात येत आहे.
व्यवस्थापनाने कामगारांची केवळ निराशा केली असून अधिकारी वर्गाला ३५ टक्के वाढ दिलेली असतांना कामगार वर्गाला तुटपुंजी ८ टक्के वाढ देऊ केल्यामुळे कामगार संपावर गेले आहेत. मागण्या मान्य होईपर्यंत संप कायम राहणार असल्याचे आंदोलनकर्त्यांनी स्पष्ट केले आहे. आंदोलनात भानुदास शेळके, सचिन ढोमसे, प्रविण तिदमे, दिपक कदम, जितु जाधव, अनिल मंडलिक, संजय कुटे, पवन आहेर, अशोक गावंडे, मनोज भामरे, आनंद बोरसे, योगेश ठुबे, संतोष पोकळे, सचिन दीक्षित, मिलिंद निकम, अशोक कदम, सुनिल थोरात, रमेश कदम, सुनील जुमळे, सागर कदम, नवनाथ मुसळे, स्वप्निल तिजोरे, चेतन घुले, संतोष आहेर, मन्सूर शेख, प्रमिला पवार, संदीप कुटे, मंगेश थेटे, राजेंद्र मोरे, नितीन पगारे, राजशेखर जाधव, सचिन धोंडगे, योगेश अहिरे, अनिल गवळी, नितीन पाटील, नितीन कदम, नंदकुमार चव्हाण, अभयसिंग चौधरी, सुशिल सातपुते, शिवाजी पोटे, हेमंत अहिरराव, चिंतामण थिटे, विकास खडताळे आदी सहभागी झाले आहे.
व्यवस्थापन कामगारांची पिळवणूक करत असल्याचा आरोप यावेळी कामगारांनी केला. व्यवस्थापनाशी अंतिम बोलणी फिसकटल्याने बेमुदत संप पुकारल्याचे कामगारांचे म्हणणे आहे. गेले ३४ महिने अधिकारीवर्ग पगारवाढीचा लाभ घेत असून, फक्त कामगारांना त्यांच्या हक्कापासून दूर ठेवण्याचे काम व्यवस्थापन करत असल्याचा आरोप कर्मचाऱ्यांनी केला आहे.

२० हजार कामगार संपावर
लष्कराला लागणाºया विमानांचे उत्पादन करणाºया हिंदुस्थान एअरोनॉटिक्स लिमिटेड (एचएएल) च्या देशभरातील ९ कारखान्यांमध्ये काम करणारे १९ हजार कामगार सोमवारपासून बेमुदत संपावर गेले आहेत. पगारवाढीसह अनेक मागण्यांसाठी त्यांनी संप सुरू केला आहे.एचएएल ही सरकारी कंपनी असून, ती प्रामुख्याने लष्कराला लागणारी विमाने तयार करते. अधिकारी व कामगार यांच्यात विविध भत्त्यांबाबत असलेला भेदभाव दूर करण्यात यावा आणि सर्वांना समान दराने भत्ते मिळायला हवेत, अशीही आमची मागणी असल्याचे कामगार संघटनेचे सरचिटणीस एस. चंद्रशेखर यांनी सांगितले. ते म्हणाले की, वाटाघाटीतून तोडगा निघावा, अशीच आमची इच्छा होती.

Web Title: Locations of 5 workers at the HAL entrance

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.