शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
2
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
3
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
4
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
5
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
6
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
7
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
8
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
9
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
10
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
11
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
12
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
13
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
14
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
15
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
16
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
17
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
18
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
19
कारमध्ये गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड किस करत असतील तर पोलीस पकडू शकता? काय सांगतो नियम? जाणून घ्या
20
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले

दरी ग्रामपंचायतीला पदाधिकाऱ्यांनी ठोकले ताळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2019 20:30 IST

दरी ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक विनोद वाघचौरे यांच्या कारभाराबाबत पदाधिकाऱ्यांनी तक्रारी केल्या असून, ग्रामपंचातयतीचा संचित निधी,पेसा निधी, सहाव्या वित्त आयोगाचा निधी तसेच इतर निधी बाबत ग्रामसेवकाकडे विचारणा केली असता ते उडवाउडवीचे उत्तरे देतात. त्यामुळे ग्रामपंचायतीकडे किती निधी जमा आहे

ठळक मुद्देग्रामसेवकाची मनमानी : पंचनामा करून कपाटेही सिलबंद

लोकमत न्युज नेटवर्कनाशिक : नाशिक तालुक्यातील दरी ग्रामपंचायतीच्या ग्रामसेवकाच्या मनमानी कारभाराच्या निषेधार्थ ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच व सदस्यांनी एकत्र येत ग्रामपंचायत कार्यालय तसेच त्यातील दोन कपाटांना ताळे ठोकून सिलबंद करण्यात आले आहेत. गेल्या दहा दिवसांपासून ग्रामपंचायतीचे कामकाज त्यामुळे ठप्प झाले असून, प्रशासनाने ग्रामसेवकाची तात्काळ बदली करावी अशी मागणी करण्यात आली आहे.

दरी ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक विनोद वाघचौरे यांच्या कारभाराबाबत पदाधिकाऱ्यांनी तक्रारी केल्या असून, ग्रामपंचातयतीचा संचित निधी,पेसा निधी, सहाव्या वित्त आयोगाचा निधी तसेच इतर निधी बाबत ग्रामसेवकाकडे विचारणा केली असता ते उडवाउडवीचे उत्तरे देतात. त्यामुळे ग्रामपंचायतीकडे किती निधी जमा आहे याची कोणतीही माहिती मिळू शकलेली नाही. १ मे व १५ आॅगष्ट रोजी झालेल्या ग्रामसेची व त्यानंतरच्या तीन विशेष ग्रामसभेची प्रोसिडींग अदयाप ग्रामसेवकाने रजिष्टरला नमूद केलेली नाही. ग्रामसभेमधील विषय, समस्या, उपययोजना, प्रश्न अडचणी या देखील नमूद करण्यात आलेल्या नाहीत. मासिक बैठकीचे अहवाल लिहीले जात नसल्याने मर्जीतील लोकांच्या कामाबाबतचे ग्रामसभेवर बेकायदेशीर ठराव घेतले जात असल्याचा संशयही व्यक्त करण्यात आला आहे. सांडपाणी वाहून जाण्यासाठी गटार व गावात रस्ते मंजूर असून, ग्रामसेवक परस्पर ठेकेदारांना नेमून काम करीत आहे त्यामुळे गुणवत्तेचे काम होतनाही. मात्र कोणत्याही सदस्य अथवा पदाधिकाºयांना न विचारता कामे केले जात असल्याने अशा ग्रामसेवकाबरोबर काम करणे शक्य नसल्याचे निवेदनात म्हटले आहे. दरी गाव हे आदिवासी पेसा क्षेत्रातील गाव असून,सदर गावाला तीन राष्टÑपती पुरस्कार मिळालेले आहेत. असे असताना ग्रामसेवकाचे मात्र विकास कामे करण्याची मानसिकता दिसत नाही. त्यामुळे सदर ग्रामसेवकाची तात्काळ बदली करावी अशी मागणी करण्यात आली आहे.ग्रामसेवकाच्या मनमानी कारभाराच्या निषेधार्थ १ आॅक्टोंबर रोजी सरपंच, उपसरपंच व सदस्यांनी एकत्र येत पोलीस पाटील शिवाजी पिंगळे यांच्या समक्ष पंचनामा करून कार्यालयातील कपाटे सील केले तसेच कार्यालयालाही कुलूप ठोकले असून, ग्रामसेवकाची बदली न झाल्यास आंदोलन करण्याचा इशारा सरपंच अलका गांगोडे, उपसरपंच अ‍ॅड. अरूण दोेंदे, सदस्य भाऊराव आचारी, सारिका भोई, अर्जुन भोई, सुनीता बेंडकोळी, शितल पिंगळे, संजना ढेरिंगे , मिना आचारी, भारत पिंगळे यांनी दिला आहे.

टॅग्स :zpजिल्हा परिषदnashik Jilha parishadनाशिक जिल्हा परिषद