पाथर्डी फाटा परिसरात देशी कट्टा जप्त
By Admin | Updated: April 25, 2017 18:58 IST2017-04-25T18:58:58+5:302017-04-25T18:58:58+5:30
पाथर्डी फाटा परिसरात देशी कट्टा जप्त
पाथर्डी फाटा परिसरात देशी कट्टा जप्त
नाशिक : पाथर्डी फाटा परिसरात देशी कट्टा घेऊन फिरणाऱ्या विल्होळी येथील संशयितास गुन्हे शाखेच्या युनिट दोनच्या पथकाने मंगळवारी सकाळच्या सुमारास अटक केली़ या संशयिताकडून देशी कट्टा जप्त करण्यात आला असून, त्यांच्यावर अंबड पोलीस ठाण्यात भारतीय हत्यार कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे़
विल्होळीतील राजवाडा परिसरात राहणारा संशयित संतोष विलास आल्हाट (२३) याच्याकडे देशी कट्टा असून, तो पाथर्डी फाट्याजवळील शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोरील बसस्टॉपजवळ असल्याची माहिती पोलीस शिपाई बाळासाहेब नांद्रे यांना मिळाली होती़ या माहितीवरून शहर गुन्हे शाखेच्या युनिट दोनच्या पथकाने सकाळी अकरा वाजेच्या सुमारास सापळा रचून आल्हाटला ताब्यात घेतले़ त्याची अंगझडती घेतली असता त्याच्या कमरेला ३० हजार रुपये किमतीचे देशी बनावटीचे पिस्तूल आढळून आले़
पोलीस उपायुक्त दत्तात्रय कराळे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट दोनचे पोलीस निरीक्षक नि़ सु़ माईनकर, सहायक पोलीस निरीक्षक रवींद्र साळुंखे, आऱ वाय़ जाधव, पोलीस शिपाई योगेश सानप, पोलीस हवालदार घडवजे, विजय पगारे यांच्या पथकाने ही कारवाई केली़ (प्रतिनिधी)