शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
2
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
3
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
4
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
5
सांगली, सातारचे ‘ते’ संजय पाटील ‘नॉट रिचेबल’; एकाच व्हेंडरकडून प्रतिज्ञापत्र अन्...
6
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
7
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
8
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
9
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
10
माझ्याकडे पैसे नाहीत, मी निवडणूक लढवू शकत नाही; नाराजी व्यक्त करत काॅंग्रेसच्या उमेदवाराने तिकीट केले परत
11
इंटरनेटवरून पसरणारा कट्टरतावाद धोकादायक; इंटरपोल परिषदेत भारताची ठाम भूमिका
12
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
13
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 
14
भाजपकडूनच राहुल गांधी यांचा जप! काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांची टीका
15
लहान सीमारेषा क्रिकेटला साजेशी नाही; अश्विन : आयपीएलमध्ये सातत्याने उभारला जातोय धावडोंगर
16
छोट्या क्रिकेट मैदानांकडे दुर्लक्ष करू नका; सरफराझ खानने नवोदित क्रिकेटपटूंना दिला सल्ला
17
दीर्घ फलंदाजीचा अभाव; हार्दिक, जडेजाच्या खराब फॉर्मची चिंता
18
इंग्लंडचा संघ निवडण्यासाठी ‘एआय’चा वापर
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

भक्षाच्या नादात विहिरीत पडलेल्या बिबट्याला जीवदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2019 2:06 PM

सुरगाणा : भक्षाच्या नादात विहिरीत पडलेल्या बिबट्याला जीवदान देण्यास वनविभागातील कर्मचाऱ्यांना यश आले आहे. कळवण तालुक्यातील कनाशी वनपरिक्षेत्र बीटातील वडाळा येथे एका विहिरीत बिबट्या असल्याचे मंगळवारी सकाळी विहिर मालकास निदर्शनास आले.

सुरगाणा : भक्षाच्या नादात विहिरीत पडलेल्या बिबट्याला जीवदान देण्यास वनविभागातील कर्मचाऱ्यांना यश आले आहे.कळवण तालुक्यातील कनाशी वनपरिक्षेत्र बीटातील वडाळा येथे एका विहिरीत बिबट्या असल्याचे मंगळवारी सकाळी विहिर मालकास निदर्शनास आले. हा बिबट्या एखाद्या भक्षाच्या नादात कथडे नसलेल्या विहिरीत सोमवारी रात्री उशिरा पडला असावा असा अंदाज व्यक्त करण्यात आला. कळवण तालुक्यातील वडाळा येथील चिंतामण गांगुर्डे हे सकाळी साडेसात वाजता मोटर चालू करण्यासाठी विहिरीजवळ गेले असता विहिरीत बिबट्या असल्याचे त्यांना दिसले. ही वार्ता पसरल्याने या विहिरीजवळ बघ्यांची मोठी गर्दी झाली होती. माहिती मिळताच कळवण व कनाशी बीटातील वन अधिकारी व कर्मचाऱ्यांना त्यांचे पथक तत्काळ वडाळा येथे उपस्थित झाले. विहिरीत भरपूर पाणी असल्याने बिबट्या विहिरीत किनारी लगत छोट्याशा जागेवर उभा होता. यावेळी वीज नसल्याने डिझेल इंजिन लावून विहिरीतील पाण्याचा उपसा करण्यात आला. त्यानंतर दोराच्या सहाय्याने पिंजरा आत सोडण्यात आला. या पिंजºयात बिबट्या आल्यानंतर त्याला वर काढण्यात येवून जंगलात सोडून देण्यात आले. बिबट्याला बाहेर काढून जंगलात सोडेपर्यंत जवळपास तीन तास लागले. याकामी वडाळा व परिसरातील ग्रामस्थांनी मोठी मदत केली. यावेळी वनपरिक्षेत्र अधिकारी सी.आर.कामडी, वनपाल डी.टी. चौधरी, एस.एस. भोये, जयदर, एम.के.बदादे, वनपाल बढे, श्रीमती चौरे, राठोड, गुंजाळ, अहिरे, बिहरम, जाधव, कोंडे, कनाशी बीटातील सर्व वनरक्षक आदी उपस्थित होते.

टॅग्स :Nashikनाशिक