तिसगाव धरणाच्या गाळात अडकलेल्या १५ गार्इंना जीवदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2019 17:41 IST2019-06-20T17:40:46+5:302019-06-20T17:41:15+5:30
दिंडोरी : तालुक्यातील सर्व धरणांनी तळ गाठला असून पाऊस लांबल्याने भीषण पाणीटंचाई निर्माण होवून जनावरांची पाण्यासाठी भटकंती सुरू आहे. पाण्याच्या शोधात तिसगाव धरणात गेलेल्या १५ कठियावाडी गाई चिखलात रु तून बसल्याचा प्रकार घडला. शेतकऱ्यांनी सदर गायींना ट्रॅक्टरच्या मदतीने गाळातून बाहेर काढत जीवदान दिले आहे.

तिसगाव धरणाच्या गाळात अडकलेल्या १५ गार्इंना जीवदान
दिंडोरी : तालुक्यातील सर्व धरणांनी तळ गाठला असून पाऊस लांबल्याने भीषण पाणीटंचाई निर्माण होवून जनावरांची पाण्यासाठी भटकंती सुरू आहे. पाण्याच्या शोधात तिसगाव धरणात गेलेल्या १५ कठियावाडी गाई चिखलात रु तून बसल्याचा प्रकार घडला. शेतकऱ्यांनी सदर गायींना ट्रॅक्टरच्या मदतीने गाळातून बाहेर काढत जीवदान दिले आहे.
तिसगाव येथील काठेवाडी लक्ष्मण गवळी हे त्यांच्या ६० गाई चारण्यासाठी सकाळी घेऊन निघाले ११ वाजता गायींना पाणी पाजण्यासाठी तिसगाव धरणाच्या दिशेने गेले. दूरवर असलेल्या पाण्याच्या शोधात गाई गाळ तुडवत पाण्यापर्यंत पोहचल्या. त्यातील इतर गाई परत आल्या, मात्र पंधरा गाई चिखलात फसत अडकल्या. त्यांना सोनजांब व खेडगांव येथील शेतकऱ्यांनी मदत केली. शेतकरी योगेश बाळासाहेब जाधव यांनी स्वत:च्या ट्रॅक्टरच्या साह्याने गायींना बाहेर काढले.
यावेळी कैलास जाधव, विश्वनाथ जाधव, रावसाहेब जाधव, सुभाष जाधव, प्रविण जाधव, सिताराम धोत्रे यांनी मदत केली.
(फोटो २० दिंडोरी ५)