शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
4
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
5
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
6
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
7
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
8
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
9
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
10
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
11
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
12
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
13
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
14
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
15
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
16
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
17
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
18
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
19
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
20
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
Daily Top 2Weekly Top 5

थेट घटनास्थळावरुन... ११० फूट उंचावरून कोसळली महाकाय क्रेनसह गर्डर

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2023 15:29 IST

भीषण अपघातात १७ ठार, ३ गंभीर जखमी : आणखी काही कामगार अडकले असल्याची भीती

पुरूषोत्तम राठोड 

थेट घटनास्थळावरून...

घोटी, ता. इगतपुरी, जि. नाशिक : सरळांबे - शहापूर (जि. ठाणे) - हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गावर होणाऱ्या विविध अपघातांच्या शृंखला कानावर येत असतांनाच समृद्धी महामार्गाच्या १६ नंबर पॅकेजमध्ये दि ३१ रोजी सरळांबे येथे रात्री ११ वाजता ब्रिजचे गर्डरवर चढवत असतांना भली मोठी क्रेन लॉन्चर कोसळल्याने झालेल्या भीषण अपघातात १७ कामगार जागीच ठार तर तीन गंभीर जखमी झाले आहेत. त्यामधील काम करणारे तीन कामगार गायब असून त्यांचा शोध सुरू आहे. सुदैवाने यामधील पाच जण सुखरूप वाचले आहेत. या ठिकाणी एकूण २७ कामगार काम करत असल्याचे कंपनी व्यवस्थापनाकडून सांगण्यात आले असले तरी स्थानिक प्रत्यक्षदर्शीच्या मते आकडा मोठा असण्याची शक्यता वर्तविले जात आहे.मलब्यात अडकलेल्या तीन कामगारांना काढण्यासाठी एनडीआरएफची टीम सेगमेंट लॉन्चर हटवण्यासाठी अथक प्रयत्न करीत आहेत.

नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गावरील नागपूर पासून कवडदरा पर्यंत महामार्ग सुरू झाला असून मुंबईला जोडणाऱ्या शेवटच्या शहापूरच्या १६ नंबरचे शेवटचे पॅकेज काम नवयुगा कंपनीकडे आहे. या कंपनीचे काम मोठ्या प्रमाणात बाकी असल्याने समृद्धी मार्ग लवकर पूर्ण करण्याच्या दृष्टीने कमी वेळात जास्त काम करण्यासाठी रात्रंदिवस काम सुरू होते. काल दि ३१ रोजी रात्री ११ वाजेच्या दरम्यान बॅलेन्स कॅन्टीलिव्हर ब्रिज सेगमेंट लोंचिंग काम सुरू होते. ११० फूट उंच पिलरवर 'गर्डर' वर दोन्ही पिलरवर चढवायचे काम सुरू असतांना. लॉंचिंग क्रेनला तोल सांभाळल्या न गेल्याने गर्डरसह भली मोठी क्रेन खाली ढासळल्याने अपघात घडला असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. यामध्ये मोठी जीवितहानी झाली असली तरी या संपूर्ण ढासळलेल्या क्रेनसह मलब्याला अजून दहा तास लागण्याची शक्यता एनडिआरएफच्या काम करणाऱ्या जवानांनी सांगितले. समृद्धीच्या पूल बांधकामावर अपघातात गंभीर जखमीं झालेल्या तीन कामगारांना ठाणे येथील रुग्णालयात दाखल केले आहे. झालेल्या अपघाताची तीव्रता बघता यामधील उर्वरित कामगार कुणीही वाचले नसल्याने प्रथमदर्शनी दिसत आहे.

अपघातस्थळी अडकलेल्या कामगारांना काढण्यासाठी स्थानिक कंपनी कामगारांच्या मदतीने एनडीआरएफची टीम रात्री दोन वाजेपासून कोसळलेल्या क्रेनसह मलबा हटवण्याचा प्रयत्न करीत असून यामधील तीन कामगार अडकले असल्याचे कंपनी व्यवस्थापनाकडून बोलल्या जात असले तरी आकडा वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

घटनास्थळी भेटी

घटनास्थळी सार्वजनिक बांधकाम मंत्री दादा भुसे, ठाण्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण, स्थानिक आमदार दौलत दरोडा, जिल्हाधिकारी अशोक शिंगारे, ठाणे जिल्हा पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने यांनी भेटी दिल्या आहेत.

मुख्यमंत्री घेणार भेट

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दुपारी अपघातस्थळी भेट देणार असल्याचे प्रशासनाच्यावतीने कळविले जात असून, जखमींची ठाण्यातील रुग्णालयात भेट घेणार असून त्यानंतर सरंबाळे येथील अपघात ठिकाणी पाहणी करणार असल्याची प्राथमिक माहिती पुढे आली आहे. 

टॅग्स :NashikनाशिकthaneठाणेAccidentअपघातSamruddhi Mahamargसमृद्धी महामार्ग