थोडा जल्लोष, जादा आक्रोश !नोटाबंदीची वर्षपूर्ती : विरोधकांकडून गोदाकाठी श्राद्धविधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 9, 2017 12:36 AM2017-11-09T00:36:58+5:302017-11-09T00:40:26+5:30

नोटाबंदीची वर्षपूर्ती : विरोधकांकडून गोदाकाठी श्राद्धविधी, मेणबत्त्या प्रज्वलित करीत श्रद्धांजली नाशिक : नोटाबंदीच्या वर्षपूर्तीचे औचित्य साधून सर्वच विरोधी पक्षांनी वर्षश्राद्ध घालण्यासारखे विविध लक्षवेधी आंदोलने करीत आक्रोश केला, तर काळे धन सापडल्याचा दावा करीत भाजपाच्या वतीने ठिकठिकाणी जल्लोष करीत समर्थन करण्यात आले. रिपाइंनेही भाजपाला साथ देत व्हाइट मनी रॅली काढली होती. अर्थात, जल्लोषाचे कार्यक्रम अल्प स्वरूपात पार पडले तर विरोधकांचे आक्रोश मात्र त्यातुलनेत अधिक होते.

A little more fun, more anger! Anniversary anniversary: ​​Goddess Shraddha from opponents | थोडा जल्लोष, जादा आक्रोश !नोटाबंदीची वर्षपूर्ती : विरोधकांकडून गोदाकाठी श्राद्धविधी

थोडा जल्लोष, जादा आक्रोश !नोटाबंदीची वर्षपूर्ती : विरोधकांकडून गोदाकाठी श्राद्धविधी

Next
ठळक मुद्दे नाशिक : थोडा जल्लोष, जादा आक्रोश !सर्वच विरोधी पक्षांनी वर्षश्राद्ध घालण्यासारखे विविध लक्षवेधी आंदोलने

थोडा जल्लोष, जादा आक्रोश !नोटाबंदीची वर्षपूर्ती : विरोधकांकडून गोदाकाठी श्राद्धविधी, मेणबत्त्या प्रज्वलित करीत श्रद्धांजली

नाशिक : नोटाबंदीच्या वर्षपूर्तीचे औचित्य साधून सर्वच विरोधी पक्षांनी वर्षश्राद्ध घालण्यासारखे विविध लक्षवेधी आंदोलने करीत आक्रोश केला, तर काळे धन सापडल्याचा दावा करीत भाजपाच्या वतीने ठिकठिकाणी जल्लोष करीत समर्थन करण्यात आले. रिपाइंनेही भाजपाला साथ देत व्हाइट मनी रॅली काढली होती. अर्थात, जल्लोषाचे कार्यक्रम अल्प स्वरूपात पार पडले तर विरोधकांचे आक्रोश मात्र त्यातुलनेत अधिक होते.
नोटाबंदी वर्षपूर्तीच्या निमित्ताने सर्वच विरोधी पक्षांच्या वतीने आक्रमक आंदोलनांचे आयोजन करण्यात आले होते. त्यानुसार शिवसेनेने भल्या सकाळी रामकुंडावर चक्क पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटांचे वर्षश्राध्द घालण्यात आले तसेच मुंडणही करण्यात आले. त्यापाठोपाठ शहर राष्टÑवादी कॉँग्रेसनेही असेच आंदोलन केले. कॉँग्रेसच्या वतीने धरणे आंदोलन करतानाच केंद्र सरकारची प्रतीकात्मक अंत्ययात्रा काढण्यात आली. तसेच अंत्यसंस्कारदेखील करण्यात आले. डाव्या पक्षांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने केली. दुपारी सर्व विरोधी पक्षांच्या वतीने भालेकर हायस्कूल ते डॉ. आंबेडकर पुतळा यादरम्यान मोर्चा काढण्यात आला.
विरोधक आक्रमक आंदोलन करीत असताना भाजपाने सहाही मंडलात जल्लोष करून मोदी सरकारच्या निर्णयाचे स्वागत केले, तर रिपाइं आठवले गटाच्या वतीने व्हाइट मनी रॅली काढण्यात आली. सीबीएसवरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ जल्लोष करण्यात आला.

Web Title: A little more fun, more anger! Anniversary anniversary: ​​Goddess Shraddha from opponents

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.