साहित्यिक ई. एन. निकम यांचे निधन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2018 01:13 IST2018-10-06T01:13:15+5:302018-10-06T01:13:43+5:30
निवृत्त कस्टम अधिकारी व रिपब्लिकन चळवळीतील ज्येष्ठ नेते, साहित्यिक एकनाथ नानाजी ऊर्फ ई.एन. निकम (७९) यांचे मुंबईत हृदय विकाराने निधन झाले.

साहित्यिक ई. एन. निकम यांचे निधन
नाशिकरोड : निवृत्त कस्टम अधिकारी व रिपब्लिकन चळवळीतील ज्येष्ठ नेते, साहित्यिक एकनाथ नानाजी ऊर्फ ई.एन. निकम (७९) यांचे मुंबईत हृदय विकाराने निधन झाले.
मोहाडी येथील निकम कुटुंबीय नाशिक-पुणे महामार्गावरील उपनगरला वास्तव्यास होते. ई. एन. निकम निवृत्तीनंतर नाशिकला स्थायिक झाले होते. त्या काळात ते नाशिकमध्ये सामाजिक चळवळीत सक्रिय होते. ‘आबदा’, ‘भीमाई’, ‘माउली’ यांसह चार काव्यसंग्रह, ‘वासना जळत आहे’ ही कादंबरी, प्रज्ञासूर्य हा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांवरील ग्रंथ, ‘समतेची सावली’ नाटक यांसह विविध १३ पुस्तके प्रकाशित झाली होती. साहित्य व कलेला प्रोत्साहन देण्यासाठी त्यांनी विविध उपक्रम राबविले. रिपब्लिकन पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष म्हणून त्यांची नुकतीच नियुक्ती झाली होती.
तत्पूर्वी ते राष्टÑवादी कॉँग्रेसच्या मागासवर्गीय सेलचे उपाध्यक्ष म्हणूनही कार्यरत होते. प्रसिद्ध गीतकार शांताराम नांदगावकर यांचे ते व्याही होत. रिपब्लिकन पक्षाचे ज्येष्ठ नेते दिवंगत दादाभाऊ निकम यांचे ते बंधू, तर पंकज निकम व प्रसिद्ध गायक हेमंत निकम यांचे ते वडील होत.