शहरं
Join us  
Trending Stories
1
मनुस्मृतीतील काही भाग अभ्यासक्रमात?; पवारांचे आरोप, फडणवीसांचं आक्रमक प्रत्युत्तर
2
भारताच्या अनेक चेक पॉईंटवर चीनचा कब्जा, केंद्र सरकारचं मौन, शशी थरूर यांचा आरोप
3
"मला फेमस व्हायचं होतं म्हणून...", पुणे अपघातातील 'बाळा'च्या कथित व्हिडिओचे सत्य आले समोर
4
Kangana Ranaut : "काँग्रेसने कंगना राणौतचा अपमान केला..."; पंतप्रधान मोदींचा जोरदार घणाघात
5
Trent Boultचा भेदक मारा, सनरायझर्स हैदराबादला ३ धक्के! काव्या मारनचा पडला चेहरा
6
"महाराष्ट्रातील उद्योग इतर राज्यात पळवले जात असताना शिंदे सरकार काय करतंय?", विजय वडेट्टीवार यांचा सवाल
7
नर्मदा बचाओ आंदोलनाच्या प्रमुख मेधा पाटकर 20 वर्षे जुन्या मानहानीच्या प्रकरणात दोषी
8
थोडी जरी नैतिकता असेल तर राजीनामा द्या; रोहित पवारांचा फडणवीस, अजितदादांवर हल्लाबोल
9
केदारनाथ मध्ये मोठा हेलिकॉप्टर अपघात टळला, चालकाच्या प्रसंगावधानामुळे वाचले प्रवाशांचे प्राण 
10
अल्पसंख्याक महिला करायची योगींचं समर्थन, अचानक गुंडांनी घरात घुसून केली मारहाण, त्यानंतर...
11
तंत्रज्ञानाची कमाल! WhatsApp चं सीक्रेट फीचर; एका कोडने 'गायब' होतील चॅट्स
12
विराट कोहलीची RCBच्या चाहत्यांसाठी सोशल मीडियावर विशेष पोस्ट, म्हणाला- "नेहमीप्रमाणे..."
13
भरधाव कारने दिली धडक; 20 फूट हवेत फेकला गेला तरुण; थरकाप उडवणारं CCTV फुटेज
14
ढेर 'सारा' प्यार! सचिन तेंडुलकरने लेक पास झाल्याची बातमी जगाला सांगितली
15
भारतीय क्रिकेट संघासाठी नवा प्रशिक्षक का मिळत नाही? सहा कारणं, ज्याचा विचार व्हायला हवा!
16
अजय देवगणच्या या सिनेमातून सोनाक्षी सिन्हाचा पत्ता कट! मराठमोळ्या अभिनेत्रीची एन्ट्री
17
पुण्यानंतर मुंबईतही तेच! अल्पवयीन मुलानं बेदरकारपणे बाइक चालवत घेतला एकाचा जीव
18
एकाच कुटुंबातील ६ जणांनी एकाच वेळी कापली हाताची नस, एक जण मृत्युमुखी, ५ गंभीर, समोर आलं धक्कादायक कारण 
19
"आचार संहितेचे बहाणे करू नका, तातडीने उपाययोजना करा", नाना पटोलेंची सरकारकडे मागणी
20
निवडणूक संपताच शिंदे गटात वादाचे फटाके; "गजानन किर्तीकरांवर कारवाई झाली तर..."

ग्रामपंचायतीच्या सभेत शाब्दिक खडाजंगी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 27, 2019 11:55 PM

येथील ग्रामपंचायत सदस्यांची मासिक सभा बुधवारी (दि.२३) बोलावण्यात आली होती. या सभेत सदस्यांना समाधानकारक माहिती व उत्तरे न देता सभा तहकूब करण्यात आल्याचा आरोप उपसरपंच अशोक पवळे व त्यांच्या सहकारी सदस्यांनी केला आहे.

एकलहरे : येथील ग्रामपंचायत सदस्यांची मासिक सभा बुधवारी (दि.२३) बोलावण्यात आली होती. या सभेत सदस्यांना समाधानकारक माहिती व उत्तरे न देता सभा तहकूब करण्यात आल्याचा आरोप उपसरपंच अशोक पवळे व त्यांच्या सहकारी सदस्यांनी केला आहे.याबाबत माहिती अशी की, एकलहरे ग्रामपंचायतीची बुधवारी मासिक सभा घेण्याची नोटीस सर्व सदस्यांना पाठविण्यात आली होती. त्यानुसार बुधवारी सकाळी ११ वाजता सभा सुरू झाली. सरपंच, उपसरपंचांसह चौदा सदस्यांची उपस्थिती होती. मात्र कृषी उत्पन्न बाजार समितीवर ग्रामपंचायतीचा प्रतिनिधी म्हणून कोणाचे नाव पाठवायचे यावरून वाद सुरू झाला. त्यानंतरही अन्य काही प्रश्नांना सरपंच व ग्रामविकास अधिकारी यांनी समाधानकारक उत्तरे दिली नाहीत.उलट सभेचा कोरम पूर्ण नाही, असे कारण सांगून सभा तहकूब करण्यात आली. त्यामुळे विरोधी सदस्यांनी यावर हरकत नोंदवत उपसरपंच अशोक पवळे यांनी आठ सदस्यांच्या स्वाक्षरीने निवेदन देऊन कोरम पूर्ण असूनही सभा तहकूब केल्याचा जाब विचारला. मात्र सरपंच व ग्रामविकास अधिकाऱ्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. ही बाब पंचायत समितीचे गटविकास अधिकारी व जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे कळवणार असल्याचे म्हटले आहे. निवेदनावर उपसरपंच अशोक पवळे, सदस्य संजय ताजनपुरे, श्रीराम नागरे, जयदेव वायदंडे, सुरेश निंबाळकर, रत्नाबाई सोनवणे, मुक्ता दुशिंग, शोभा म्हस्के, निर्मला जावळे यांच्या स्वाक्षºया आहेत.बाजार समितीच्या पत्रात स्पष्टपणे निर्देश आहेत की, सरपंच किंवा त्यांनी सुचविलेला प्रतिनिधी पाठवावा. सरपंचांनीच जायचे ठरवले तर अन्य प्रतिनिधी पाठवायचा संबंधच येत नाही. मासिक सभेच्यावेळी प्रोसिडिंग बुकवर स्वाक्षरी केल्यानंतरच सभेला सुरु वात करण्याची नियमावली आहे.- मोहिनी जाधव, सरपंच, एकलहरेबाजार समितीवर एकलहरे ग्रामपंचायतीमधून सदस्य म्हणून नाव पाठविण्याचे ठरले होते. मात्र सरपंच व ग्रामविकास अधिकारी यांनी अधिकाराचा गैरवापर करून सरपंचांचे नाव पाठविले. ही हुकूमशाही असून विरोधक म्हणून आपल्यावर नेहमीच अन्याय होत आला आहे.- संजय ताजनपुरे,माजी सरपंच एकलहरेनियमानुसार उपसरपंच व त्यांच्या सहकाºयांनी प्रोसिडिंग बुकवर स्वाक्षरी केली नाही. फक्त सात सदस्यांनी सह्या केल्या. त्यामुळे कोरमअभावी सभा तहकूब करून दि.५ नोव्हेंबरला पुन्हा घेण्याचे जाहीर केले.- सुरेश वाघ,ग्रामविकास अधिकारी

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतNashikनाशिक