ग्रामपंचायतीच्या सभेत शाब्दिक खडाजंगी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 28, 2019 00:04 IST2019-10-27T23:55:00+5:302019-10-28T00:04:24+5:30
येथील ग्रामपंचायत सदस्यांची मासिक सभा बुधवारी (दि.२३) बोलावण्यात आली होती. या सभेत सदस्यांना समाधानकारक माहिती व उत्तरे न देता सभा तहकूब करण्यात आल्याचा आरोप उपसरपंच अशोक पवळे व त्यांच्या सहकारी सदस्यांनी केला आहे.

ग्रामपंचायतीच्या सभेत शाब्दिक खडाजंगी
एकलहरे : येथील ग्रामपंचायत सदस्यांची मासिक सभा बुधवारी (दि.२३) बोलावण्यात आली होती. या सभेत सदस्यांना समाधानकारक माहिती व उत्तरे न देता सभा तहकूब करण्यात आल्याचा आरोप उपसरपंच अशोक पवळे व त्यांच्या सहकारी सदस्यांनी केला आहे.
याबाबत माहिती अशी की, एकलहरे ग्रामपंचायतीची बुधवारी मासिक सभा घेण्याची नोटीस सर्व सदस्यांना पाठविण्यात आली होती. त्यानुसार बुधवारी सकाळी ११ वाजता सभा सुरू झाली. सरपंच, उपसरपंचांसह चौदा सदस्यांची उपस्थिती होती. मात्र कृषी उत्पन्न बाजार समितीवर ग्रामपंचायतीचा प्रतिनिधी म्हणून कोणाचे नाव पाठवायचे यावरून वाद सुरू झाला. त्यानंतरही अन्य काही प्रश्नांना सरपंच व ग्रामविकास अधिकारी यांनी समाधानकारक उत्तरे दिली नाहीत.
उलट सभेचा कोरम पूर्ण नाही, असे कारण सांगून सभा तहकूब करण्यात आली. त्यामुळे विरोधी सदस्यांनी यावर हरकत नोंदवत उपसरपंच अशोक पवळे यांनी आठ सदस्यांच्या स्वाक्षरीने निवेदन देऊन कोरम पूर्ण असूनही सभा तहकूब केल्याचा जाब विचारला. मात्र सरपंच व ग्रामविकास अधिकाऱ्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. ही बाब पंचायत समितीचे गटविकास अधिकारी व जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे कळवणार असल्याचे म्हटले आहे. निवेदनावर उपसरपंच अशोक पवळे, सदस्य संजय ताजनपुरे, श्रीराम नागरे, जयदेव वायदंडे, सुरेश निंबाळकर, रत्नाबाई सोनवणे, मुक्ता दुशिंग, शोभा म्हस्के, निर्मला जावळे यांच्या स्वाक्षºया आहेत.
बाजार समितीच्या पत्रात स्पष्टपणे निर्देश आहेत की, सरपंच किंवा त्यांनी सुचविलेला प्रतिनिधी पाठवावा. सरपंचांनीच जायचे ठरवले तर अन्य प्रतिनिधी पाठवायचा संबंधच येत नाही. मासिक सभेच्यावेळी प्रोसिडिंग बुकवर स्वाक्षरी केल्यानंतरच सभेला सुरु वात करण्याची नियमावली आहे.
- मोहिनी जाधव, सरपंच, एकलहरे
बाजार समितीवर एकलहरे ग्रामपंचायतीमधून सदस्य म्हणून नाव पाठविण्याचे ठरले होते. मात्र सरपंच व ग्रामविकास अधिकारी यांनी अधिकाराचा गैरवापर करून सरपंचांचे नाव पाठविले. ही हुकूमशाही असून विरोधक म्हणून आपल्यावर नेहमीच अन्याय होत आला आहे.
- संजय ताजनपुरे,
माजी सरपंच एकलहरे
नियमानुसार उपसरपंच व त्यांच्या सहकाºयांनी प्रोसिडिंग बुकवर स्वाक्षरी केली नाही. फक्त सात सदस्यांनी सह्या केल्या. त्यामुळे कोरमअभावी सभा तहकूब करून दि.५ नोव्हेंबरला पुन्हा घेण्याचे जाहीर केले.
- सुरेश वाघ,
ग्रामविकास अधिकारी