उपनगर : आर्टिलरी सेंटरला लागूनच असलेल्या अश्विन कॉलनीत गुरुवारी सकाळी बिबट्याचा बछडा सापडल्याने दुसऱ्या दिवशी शुक्रवारी सकाळी आर्टिलरी सेंटर जॉगिंग ट्रॅकवर भीतीमुळे सन्नाटा पसरला होता.आर्टिलरी सेंटरलगत जयभवानी रोड येथील अश्विनी कॉलनीतील एका बंगल्यात गुरुवारी सकाळी नर बिबट्याचा बछडा आढळून आला. वन विभागाने बछड्याला जेरबंद केले असले तरी अश्विन कॉलनी व आजूबाजूच्या भागात भीतीचे वातावरण पसरले आहे. जॉगिंग ट्रॅकवर सन्नाटाअश्विन कॉलनी लगत आर्टिलरी सेंटर येथे जॉगिंग ट्रॅक असून, पहाटे पाच वाजेपासून या ठिकाणी युवकांपासून वयोवृद्धांपर्यंत मॉर्निंग वॉकला येणाऱ्यांची मोठी गर्दी असते. मात्र गुरुवारी जॉगिंग ट्रॅकशेजारील अश्विन कॉलनी भागात बिबट्याच्या बछड्याचे दर्शन झाल्याने रहिवाशांसह जॉगिंग ट्रॅकवर फिरण्यास येणाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरल्याने दुसऱ्या दिवशी शुक्रवारी जॉगिंग ट्रॅकवर सन्नाटा पसरला होता. विशेष म्हणजे सायंकाळनंतर अश्विन कॉलनी व आजूबाजूच्या भागात रहिवासी घराचे दरवाजे-खिडक्या बंद करण्याबाबत विशेष काळजी घेत आहे. (वार्ताहर)
बछडा पकडल्याने जॉगिंग ट्रॅक सुना
By admin | Updated: August 21, 2015 23:56 IST