निवेक टेनिस लीगमध्ये लीलावती प्राईडला विजेतेपद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:46 IST2021-02-05T05:46:16+5:302021-02-05T05:46:16+5:30
नाशिक : निवेक प्रीमियर लीग टेनिस स्पर्धेत लीलावती प्राईडला विजेतेपद तर आर.डी. लीगल रॉयल संघाने उपविजेतेपद पटकावले. एस ...

निवेक टेनिस लीगमध्ये लीलावती प्राईडला विजेतेपद
नाशिक : निवेक प्रीमियर लीग टेनिस स्पर्धेत लीलावती प्राईडला विजेतेपद तर आर.डी. लीगल रॉयल संघाने उपविजेतेपद पटकावले. एस टेनिस अकादमीच्या अंशीत देशपांडे आणि अंशुन पाटील यांची कामगिरी चमकदार ठरली.
प्रजासत्ताक दिनानिमित्त निवेक स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स येथे निवेक प्रीमियर टेनिस लीग स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत एस टेनिस अकादमीचे खेळाडू अंशीत देशपांडे आणि अंशुन पाटील यांनी चमकदार कामगिरी करून या स्पर्धेवर छाप पाडली. या स्पर्धेत अंशीत देशपांडेने लीलावती प्राईड या संघाचे प्रतिनिधित्व केले तर अंशुन पाटीलने आर. डी. लीगल रॉयल या संघाचे प्रतिनिधित्व केले. विजेतेपदासाठी या दोन संघादरम्यान चांगलीच चुरस दिसून आली. परंतु या अटीतटीच्या अंतिम लढतीत लीलावती प्राईड संघाने जोमाने खेळ करून विजेतेपदावर आपली मोहोर उमटवली. लीलावती प्राईड संघाकडून खेळताना अंशीत देशपांडेने खेळात सातत्य राखत आपल्या संघाला विजेतेपद मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका पार पडली. तर अंशुन पाटीलनेही आर. डी. लीगल रॉयल संघाकडून खेळतांना चांगले प्रदर्शन करून आपल्या संघाला उपविजेतेपद मिळवून देण्यात मोलाचा हातभार लावला. त्यांच्या या यशाबद्दल रचना ट्रस्ट कल्चरल स्पोर्ट्सचे संचालक डॉ. अर्चिस नेर्लिकर, राजीव देशपांडे, सत्यजित पाटील, जितेंद्र सावंत, केतन रणदिवे, अद्वैत आगाशे यांनी अभिनंदन केले.