शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉस पूर्वीची ती चार मिनिटे...! भारत सरकारची मंजुरी अन् BCCIचा मॅच रेफरींना संदेश पोहोचला...
2
स्कुबा डायव्हिंग करताना ५२ वर्षीय प्रसिद्ध गायकाचा मृत्यू, चाहत्यांना मोठा धक्का
3
परप्रांतीयांना भाड्याने घरं देऊ नका, पंजाबमध्ये ठिकठिकाणी आवाहन; यूपी-बिहारींना हाकलण्याची मागणी
4
"काय अर्थ निघतील, याचाही विचार केला पाहिजे", CM फडणवीसांनी गोपीचंद पडळकरांचे टोचले कान
5
तीन सख्ख्या बहिणींवर नातेवाईकच २०२० पासून करत होता बलात्कार; अहिल्यानगरमधील संतापजनक घटना
6
स्कँडल, कर्ज आणि घसरते शेअर्स... जगातील सर्वात मोठ्या फूड कंपनीला वाचवू शकतील का नवे बॉस?
7
VIDEO: अरे देवा! 'मोटूलाल'ने प्यायली ७२ लाखांची दारू, जमीनही विकली; मुलाखत झाली व्हायरल
8
इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत संघात स्थान का मिळालं नाही? कुलदीपचं गंभीरबाबत मोठं विधान, म्हणाला...
9
'सकाळी उठतात, डोळे चोळत काहीही पोस्ट करतात...', कंगना राणौतचा राहुल गांधींवर पलटवार
10
तुम्हालाही छोट्या छोट्या गोष्टींचा राग येतो, आताच ठेवा ताबा नाहीतर हार्ट अटॅकचे ठराल बळी
11
तुमचा मारुती, ह्युंदाई, टाटावर विश्वास पण डीलर्सचा? या कंपन्या त्यात नाहीच...
12
महायुती सरकारमध्ये सहकारी होण्याचा निर्णय का घेतला? पक्षाच्या चिंतन शिबिरात दादांनी स्पष्टच सांगितलं!
13
कोण होईल रशियाचा पुढचा राष्ट्राध्यक्ष? राजकीय वारसदाराबद्दल व्लादिमीर पुतिन यांचा खुलासा
14
Gold Silver Price 19 September: सोन्याच्या दरात घसरण, पण चांदीच्या किमतीत जोरदार उसळी; कॅरेटनुसार पाहा सोन्याचे नवे दर
15
'हाफिज सईदला भेटलो, याबद्दल मनमोहन सिंग यांनी आभार मानले', यासिन मलिकचा खळबळजनक दावा
16
‘मोहरा’ मध्ये सुनिल शेट्टीसोबत रोमान्स करणारी ही अभिनेत्री आता दिसते अशी, ओळखणंही झालं कठीण
17
अनिल अंबानी यांना दणका; येस बँक कर्ज घोटाळा प्रकरणात CBI कडून चार्जशीट दाखल
18
सेकंड हँड कारच्या किंमती धडाधड घसरल्या...; स्पिनी, कार्स २४ सारखे २ लाखांपर्यंत डिस्काऊंट देऊ लागले...
19
"मोदी-फडणवीसांच्या आईवर बोलले गेले, तेव्हा शरद पवारांनी फोन केला नाही, मी माफी कशासाठी मागू"
20
सरकारी नोकरी मिळवण्याचा गोल्डन चान्स; इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियामध्ये भरती

विजांचा कडकडाट अन‌् ढगांच्या गडगडाटासह शहरात सर्वत्र धुवाधार पाऊस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 18, 2020 15:25 IST

पुढील ४८ तासांत गुजरातसह संपुर्ण महराष्ट्रात वादळी पाऊस होण्याचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आलेला आहे.

ठळक मुद्देपंचवटीत मुसळधार; रस्ते जलमय

नाशिक : शहर व परिसरात दुपारी सव्वा दोन वाजेच्या सुमारास ढगांच्या गडगडाटासह जोरदार पावसाला सुरुवात झाली. साधारणत: शहराच्या मध्यवर्ती परिसरात तीन वाजेपर्यंत पाऊस सुरु होता. पंचवटी, सिडको, नाशिकरोड, इंदिरानगर या भागात पावसाचा जोर अधिक राहिल्याचे दिसून आले. अचानक आलेल्या परतीच्या पावसाने नागरिकांची तारांबळ उडाली. शहरातील सर्वच मोकळ्या भुखंडांना तलावाचे स्वरुप प्रा्प्त झाले होते. रस्त्यांवरुन पाण्याचे पाट वाहू लागले होते.बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचे क्षेत्र हळुहळु अरबी समुद्राला जाऊन मिळाल्यानंतर आता अरबी समुद्रात एक नवीन कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. ते पुढील ४८ तासांत ओमानच्या दिशेने सरकण्यास सुरुवात होणार आहे. यामुळे गुजरातसह संपुर्ण महराष्ट्रात वादळी पाऊस होण्याचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आलेला आहे. चार दिवसांपुर्वीही अशीच काहीशी स्थिती निर्माण झाली होती. शहरात शुक्रवारी झालेल्या पावसाच्या तुलनेत आज रविवारी जोरदार पाऊस झाला.पंचवटी : रविवारी दुपारच्या सुमाराला अचानकपणे परतीच्या पावसाने दमदारपणे हजेरी लावल्याने पंचवटीतील बहुतांशी रस्ते जलमय झाले होते.साधारणपणे अर्धा तास विजांचा कडकडाटासह मुसळधार पाऊस झाल्याने रस्ते काही काळ ओस पडले होते रविवारचा दिवस असल्याने कामानिमित्त बाहेर पडलेल्या नागरिकांची दुपारी आलेल्या पावसामुळे चांगली तारांबळ उडाली.ऑक्टोबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात परतीचा पाऊस दमदारपणे हजेरीलावेल अशी शक्यता वेधशाळेने वर्तविली होती. त्यानुसार चार ते पाच दिवसांपूर्वी शहरात पावसाचे पुनरागमन झाले होते.रविवारी झालेल्या पावसामुळे रस्त्यावर पाणीच पाणी साचले होते तर गल्लीबोळातील रस्त्यावरून पाण्याचे पाट वाहत होते रस्त्यावर पाणी साचल्याने दुचाकी वाहन चालकांना भर पाण्यातून तारेवरची कसरत करत मार्गक्रमण करावे लागले. उंचसखळ भागात तसेच मोकळ्या भूखंडावर पाणीच पाणी साचले होते. पंचवटीतील गावठाण भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जुना आडगाव नाका, गजानन चौक परिसर, दिंडोरी रोड, गणेशवाडी, भाजीमंडई समोरील परिसरासह अन्य भागातील काही रस्त्यांवर पावसाचे पाणी साचले होते तर पावसामुळे नाले ओसंडून वाहू लागल्याचे चित्र दिसून आले.

टॅग्स :NashikनाशिकRainपाऊसweatherहवामानgodavariगोदावरी