शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

धरणक्षेत्रांत जोरदार; शहरात दिवसभर हलक्या सरींचा वर्षाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 6, 2020 17:56 IST

सोमवारी सकाळी नाशिक तालुक्यासह त्र्यंबकेश्वर व इगतपुरी तालुक्यात मुसळधार पाऊस झाला. या दोन्ही तालुक्यांत सोमवारी सकाळी अनुक्रमे ३८ व ६२ मिमी इतका पाऊस मोजला गेला.

ठळक मुद्देआकाशात ढगांची गर्दी अन् हलक्या सरींची हजेरीगंगापूर धरणसाठा ४५.९१ टक्के इतका झाला

नाशिक : शहर व परिसरासह रविवारी (दि.५) मध्यरात्रीपासून पावसाचा जोर वाढला आहे. रात्री दोन वाजेपासून पहाटेपर्यंत शहरासह धरणक्षेत्रांतदेखील पावसाने जोरदार हजेरी लावली. तसेच सोमवारी (दि.६) सकाळी साडे आठ ते संध्याकाळी साडेपाच वाजेपर्यंत ४.३ मिमी इतका पाऊस शहरात मोजला गेला तर मागील २४ तासांत १८ मिमी इतका पाऊस झाल्याची नोंद हवामान निरिक्षण केंद्राकडून करण्यात आली.सोमवारी सकाळपासूनच शहरात ढगाळ हवामान कायम होते. दिवसभर नाशिकककरांना अवघे काही मिनिटेच सुर्यदर्शन घडले. अधुनमधुन पावसाच्या हलक्या सरींचा वर्षाव कायम राहिला. यामुळे शहराच्या मध्यवर्ती भागासह उपनगरांमध्येही पावसाची रिपरिप नागरिकांनी अनुभवली. सर्वत्र चिखलाचे साम्राज्य पसरले. तसेच रविवारी मध्यरात्रीपासूनच शहरात वाऱ्याचा वेग नेहमीपेक्षा अधिक वाढल्यामुळे वातावरणात कमालीचा गारवा जाणवू लागला आहे. वारे वेगाने वाहू लागल्याने दिवसभर आकाशात ढगांची गर्दी अन् हलक्या सरींची हजेरी सुरू राहिली.मुंबईच्या समुद्रकिना-यावर वा-याचा वेग वाढला असून दोन दिवसांपासून पाऊसही जोरदार सुरू आहे. यामुळे शहराच्या वातावरणावरही त्याचा प्रभाव दिसून येत आहे. पुढील दोन दिवस मुंबईत पावसाचा इशारा हवामान खात्याकडून वर्तविला गेला आहे. यामुळे नाशिक शहरासह जिल्ह्यातही पावसाने जोरदार हजेरी लावली. सोमवारी सकाळी नाशिक तालुक्यासह त्र्यंबकेश्वर व इगतपुरी तालुक्यात मुसळधार पाऊस झाला. या दोन्ही तालुक्यांत सोमवारी सकाळी अनुक्रमे ३८ व ६२ मिमी इतका पाऊस मोजला गेला.--इन्फो--गंगापूर धरण समुहात झालेला पाऊस असागंगापूर धरण समुहातदेखील पावसाने मध्यरात्रीपासून सोमवारी पहाटेपर्यंत जोरदार हजेरी लावली. तसेच सोमवारी दिवसभरही पावसाच्या कधी हलक्या तर कधी मध्यम सरींचा वर्षाव या भागात सुरूच होता.गंगापूर-४०मिमीअंबोली-४५ मिमीकाश्यपी-१५ मिमीगौतमी-२९ मिमी इतका पाऊस पाणलोट क्षेत्रात मोजण्यात आला. यामुळे गंगापूर धरणात नव्याने ५१ दलघफू इतक्या पाऊसपाण्याची आवक झाली. सध्या धरणसाठा ४५.९१ टक्के इतका झाला आहे. 

टॅग्स :RainपाऊसNashikनाशिकgangapur damगंगापूर धरण